‘इस्त्रो’चे सिवन व मोदींच्या मिठीचे खरे रहस्य – eNavakal
News देश मुंबई

‘इस्त्रो’चे सिवन व मोदींच्या मिठीचे खरे रहस्य

मुंबई – शनिवारी सकाळी ‘इस्त्रो’चा विक्रम लँडरचा तुटलेला संपर्क तमाम भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकवून गेला. मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले शास्त्रज्ञांचे सांत्वन आणि ‘इस्त्रो’ प्रमुख डॉ.के.सिवन यांना मारलेली करकचून मिठी यामुळे भारतीय जनता भारावली. मात्र ही मिठी शास्त्रज्ञाचे मनोबल उंचावण्यासाठी नव्हती. तर डॉ.सिवन यांनी अंतराळ उपग्रह (सॅटेलाईट) बनविण्याचे कंत्राट मोदींचे परममित्र उद्योगपती अदानींना दिल्यामुळे होती. हा प्रकार देशविघातक आहे.

‘इस्त्रो’ने डझनावारी सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट उद्योगपती अदानींच्या ‘अदानी डिफेन्स’ म्हणजे पुर्वीची ‘अल्फा डिझाईन्स लिमिटेड’, ‘भारत इलेक्ट्रॉनिक’ व ‘टाटा अ‍ॅडव्हान्स’ या कंपन्यांना दिले आहे. त्यापैकी 27 सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट ‘अल्फा डिझाईन्स’ म्हणजेच ‘अदानी डिफेन्स’ कंपनीला मिळाले आहे. वास्तविक ‘इस्त्रो’ ही अंतराळ संशोधन संस्था हे सॅटेलाईट बनविण्यासाठी कार्यक्षम असताना आणि ‘इस्त्रो’ने यापूर्वी भारताच्या अंतराळ मोहिमासाठी सॅटेलाईट बनविले असताना खासगी कंपन्यांना सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट देणे हे देशाच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक आहे. तसेच भारताच्या अंतराळ मोहिमांच्या सुरक्षिततेला धोकादायक आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी अथक परिश्रमाने तयार केलेल्या तंत्रज्ञानाची गोपनीय माहिती खासगी कंपन्यांच्या हाती देण्याचा हा देशद्रोहीपणा आहे. हे देशाच्या अंतराळ संशोधनाच्या गोपनीय माहितीसाठी धोकादायक आहे.
मात्र ‘इस्त्रो’ प्रमुख डॉ.के.सिवन यांनी पंतप्रधान मोदींच्या अदानी प्रेमाखातर केले. तसे करताना अनेक देशविघातक आणि गुन्हेगारी स्वरुपाच्या अनेक गोष्टी सिवन यांनी केल्या. सर्वप्रथम जगभरात ‘काळ्या यादीत’ असलेल्या ‘अल्फा डिझाईन्स’ या इटालियन कंपनीला सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट दिले. ‘पनामा’च्या जाहीर झालेल्या भ्रष्टाचार्‍यांच्या यादीतही ‘अल्फा डिझाईन्स लिमिटेड’चे नाव आहे. तसेच इटालियन सरकारचा या ‘अल्फा डिझाईन्स लिमिटेड’ कंपनीवर राग असतानाही ‘इस्त्रो’ने या कंपनीला कंत्राट दिले. या व्यवहारामागे मोदींचे अदानी प्रेम आहे.
2018 मध्ये ‘इस्त्रो’ने ‘अल्फा डिझाईन्स लिमिटेड’ कंपनीला 27 सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट दिले आणि लगोलग 2019 मध्ये उद्योगपती गौतम अदानी यांनी ही कंपनी अवघ्या 400 कोटी रुपयांना विकत घेतली. म्हणजे ही कंपनी अदानी विकत घेणार हे माहीत असल्यानेच त्या कंपनीला 27 सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट देण्यात आले. हा काही योगायोग नाही तर ‘सोची समझी चाल’ होती. जगभरात गाजलेल्या ‘पनामा’ प्रकरणात देखील या कंपनीचे नाव आहे. ‘अल्फा डिझाईन्स लिमिटेड’वर भ्रष्टाचाराचे मजबूत आरोप लावण्यात आले होते. अशा या बदनाम व नितिमत्ता नसलेल्या कंपनीच्या हाती भारताचे अंतराळ संशोधन सोपविण्याचे देशविघातक कृत्य ‘इस्त्रो’ प्रमुख के. सिवन यांच्या हातून घडले आहे किंवा मोदी सरकारने त्यांच्याकडून करवून घेतले आहे.
हे सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्यापूर्वी तपन मिश्रा या अंतराळ शास्त्रज्ञाचा बळी देण्यात आला. तपन मिश्रा हे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. डॉ.सिवन यांच्यानंतर तपन मिश्रा हेच ‘इस्त्रो’चे प्रमुख होणार होते. त्यांनी भारताचे अंतराळ सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट खासगी कंपन्यांना द्यायला कडाडून विरोध केला होता. त्यावेळी तपन मिश्रा हे इस्त्रोच्या अहमदाबाद येथील स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरचे डायरेक्टर होते. तपन मिश्रा यांनी सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट खासगी कंपन्यांना द्यायला विरोध करताच ‘इस्त्रो’ प्रमुख डॉ.सिवन यांनी त्यांची स्पेस डायरेक्टरच्या पदावरून उचलबांगडी करून त्यांची ‘इस्त्रो’च्या मुख्यालयात सल्लागारपदी नियुक्ती केली. याचा अर्थ तपन मिश्रा हे ‘इस्त्रो’च्या अंतराळ कार्यक्रम राबविणार्‍या मुख्य शास्त्रज्ञांमध्ये नसून फक्त सल्ला द्यायच्या समितीत आहेत.
ज्यांचे फक्त कामच बोलते अशा तपन मिश्रा या निष्णांत अंतराळ शास्त्रज्ञाने फक्त सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट खासगी कंपनीला द्यायला दीड वर्षांपूर्वी विरोध केला म्हणून तपन मिश्रांना अडगळीत टाकून शास्त्रज्ञ म्हणून संपविण्याचा भयानक प्रकार डॉ.के.सिवन यांनी केला आहे.
सध्या ‘चांद्रयान 2’ मोहिमेमुळे डॉ.सिवन यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. परंतु त्यांची ही काळी व देशविघातक बाजू देशासमोर येणे गरजेचे आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

एमआयएमचे दरवाजे बंद आहेत! पुण्यात प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

पुणे – विधानसभा निवडणुकीकरिता युती करण्यासाठी एमआयएमकडून दरवाजे बंद आहेत. मात्र, वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर...
Read More
post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत घोळ अजूनही सुरुच

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज दुपारी जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय आधीच...
Read More