इलेक्ट्रीक वाहनांसाठी ‘बेस्ट’च्या आगारात चार्जिंग पॉईंटचा घाट – eNavakal
News मुंबई वाहतूक

इलेक्ट्रीक वाहनांसाठी ‘बेस्ट’च्या आगारात चार्जिंग पॉईंटचा घाट

मुंबई – आर्थिक संकटात असलेल्या ‘बेस्ट’ला बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतानाच आता बेस्टच्या आगारात खासगी इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंगच्या पॉईंटचा घाट घालण्यात आला आहे. देशात इलेक्ट्रिक वाहने बनवणार्‍या महिंद्रा इलेक्ट्रीक, महिंद्रा ग्रुप यांच्याशी यासाठी राज्य सरकारने हातमिळवणी केली आहे. याचा पहिला टप्पा म्हणून बेस्ट आगारात महिंद्रा ग्रुपद्वारे इलेक्ट्रिक वाहनांकरीता चार्जिंग पाँईंट उभारण्यासाठी राज्य सरकारने बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट (बेस्ट) यांना विचारणा केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या पायाभूत सुविधेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार 31 मे रोजी एका कार्यक्रमात महिंद्रा ग्रुपसोबत या करारावर सही करणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी म्हणाले की, बेस्ट आगारात चार्जिंग पॉईंट पुरविण्यासाठी आणि राज्य सरकारच्या पुढाकारांना पाठिंबा देण्यासाठी बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांना सांगितले आहे. तर बागडे म्हणाले की, बेस्टने आधीच गोल्डस्टोन इंफ्राटेककडून सहा बसेस घेतल्या असून त्या चांगल्या आहेत. आणखी 80 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर द्यायची होती, मात्र भाडेतत्वावरील बसच्या न्यायालयीन सुनावणीमुळे हा करार अडकल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिंद्रा ग्रुपने ज्यावेळी ई-टॅक्सी ही संकल्पना राबवण्यास सुरूवात केली तेव्हापासून आम्ही बेस्ट आगारात चार्जिंग पॉईंटची योजना राबवण्याचे ठरवले आहे. इलेक्ट्रिक चार्जिंग वाहनांमुळे शहरात शुन्य प्रदुषण होणार असून त्याचा फायदा प्रवाशांना आणि पादचार्‍यांना होणार असल्याचेही बागडे म्हणाले.
वाढत्या प्रदुषणावर मात करण्यासाठी ईलेक्ट्रिक कार, बस आणि टॅक्सी असण्यासाठी आम्ही राज्य सरकारसोबत काम करत असल्याचे महिंद्रा ग्रुपच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. राज्यातील वीज दर हा इतर राज्यांपेक्षा जास्त असून दिल्ली, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी वेगळ्या विद्युत दरांची घोषणा केली आहे. तसेच राज्यात सध्याचा डिझेलचा खर्च किंचित कमी असून भविष्यात त्याला आणखी खाली येण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. तर अतिरिक्त मुख्य सचिव सुनिल पोरवाल म्हणाले की, जेथे शक्य असेल तेथे इलेक्ट्रिक वाहनांसाठी आम्ही पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देत आहोत. राज्य सरकारने पार्किंग लॉट, गृहनिर्माण संस्था, मॉल आणि चित्रपट गृहांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग पॉईंटसाठी परवानगी दिली आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात हैदराबादमध्ये पायलट इलेक्ट्रिक वाहन योजनेसाठी महिंद्रा इलेक्ट्रिकने कॅब र्व्हिसेस कंपनी मेरूशी करार केपला असून लवकरच या प्रकल्पाची इतर शहरांमध्ये पुनरावृत्ती करण्यात येणार आहे.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More