इलेक्ट्रिक टॉवरला गळफास घेऊन इसमाची आत्महत्या – eNavakal
News महाराष्ट्र

इलेक्ट्रिक टॉवरला गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

औरंगाबाद -औरंगाबादच्या जटवाडा रोडवरील बशीर नगरजवळ आज सकाळी हाय टेंशन इलेक्ट्रिक टॉवरला गळफास घेऊन एका इसमाने आत्महत्या केली. संजय बनकर (30) असे या तरुणाचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

ही माहिती नागरिकांनी तात्काळ बेगमपुरा पोलीस स्टेशनला दिली. बेगमपुरा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता या व्यक्तीची ओळख पटली. मृतदेह हायटेन्शन टॉवरवर बर्‍याच उंचीवर लटकलेला असल्याने खाली उतरविणे अवघड होते. पोलिसांनी अग्निशमन दलाची यासाठी मदत घेतली. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी दोरीच्या सहाय्याने मृतदेहास खाली उतरवून घेतले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी घाटी रुग्णालयात पाठविला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More
post-image
देश

पश्चिम बंगालचे डॉक्टर ममता बॅनर्जींसोबत सशर्त चर्चेस तयार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीनंतर संपावर असलेले शिकाऊ डॉक्टर चर्चेसाठी तयार झाले आहेत. मात्र ‘आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत...
Read More