इरफान खानवर 4 केमो पूर्ण – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन विदेश

इरफान खानवर 4 केमो पूर्ण

मुंबई – बॉलिवूड अभिनेता इरफान खान याच्यावर लंडन येथे न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर या कॅन्सरच्या आजारावर उपचार सुरु आहेत. त्याच्यावर 4 केमो पूर्ण झाल्या असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यानंतर इरफान खानने नुकतीत एका मुलाखतीतून आपल्या प्रकृती आणि उपचारांविषयी माहिती दिली. या मुलाखतीत इरफान खान याने सांगितले की, केमोचे सहापैकी चार सेशन पूर्ण झाले आहेत. जेव्हा सहा सेशन पूर्ण होतील तेव्हा पुन्हा एकदा कॅन्सर स्कॅन होईल. मात्र तिसरे सेशन पूर्ण झाल्यावर पॉजिटिव्ह रिझल्ट आला आहे. तरीही सहाव्या सेशनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे आणि तेव्हाच आजाराबाबत स्पष्टपणे समजेल. मग पाहूया आयुष्य मला कुठे घेऊन जाते, असे इरफान म्हणाला.

आजार आणि उपचारांबद्दल इरफान म्हणाला की, आजारपणात मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून आयुष्याला पाहिले आहे. आयुष्यात तुमच्यासमोर अनेक आव्हाने येतात, पण मला वाटतं की, हा माझ्यासाठी कठीण परीक्षेचा काळ आहे. मी आता एका वेगळ्या अवस्थेत आहे. सुरुवातीला मला आजाराबाबत समजले तेव्हा धक्का बसला. पण मी आता स्वत:ला जास्त ताकदवान, प्रोडक्‍टिव्ह आणि निरोगी समजत आहे.

“मी या आजारातून बरा होईन की नाही असं सुरुवातीला लोकांना वाटत होते. कारण माझ्या हातात काही नाही. आयुष्याला जे मंजूर असेल तेच होईल. पण जे काही माझ्या हातात आहे, ते मी सांभाळू शकतो. आयुष्याने मला एवढं काही दिले की, त्याच्याप्रति कृतज्ञ असायला हवी. उपचारादरम्यान माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मी आता अशा स्थितीत आहे की, मी 30 वर्षे जरी मेडिटेशन केले असते तरी इथे आलो नसतो, असे इरफान म्हणाला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More