इम्रान खान यांना तिसऱ्यांदा विवाह कबूल ! – eNavakal
विदेश

इम्रान खान यांना तिसऱ्यांदा विवाह कबूल !

इस्लामाबाद- तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख तसेच उत्कृष्ट क्रिकेटपटू अशी ओळख असलेले इम्रान खानने तिसऱ्यांदा निगाह  कबुल हे म्हणत पुन्हा संसाराच्या बेडीत अडकल्याची चर्चा सध्या पाकिस्तानमध्ये सुरु आहे. इमरान नेहमी ज्या महिलेकडून अध्यात्माचे धडे गिरवत होता त्याच महिलेसोबत त्याने लग्न झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे.  १ जानेवारी रोजी लाहोरमध्ये हे लग्न झाल्याची माहिती  पाकिस्तान माध्यमांच्या वतीने सांगण्यात आले आहे.  यासंदर्भात तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्य मुफ्ती सईद यांना इमरानच्या विवाहाबद्दल विचारले असता  सईद यांनी याचे उत्तर देणे टाळले.  यापूर्वी इम्रान खानने क्रिकेट मधून सन्यास घेतल्यानंतर 16 मे 1995 मध्ये ब्रिटनमध्ये रहाणा-या जेमिमा गोल्डस्मिथ सोबत लग्न केले होते. मात्र त्याचा हा संसार जेमतेम नऊवर्षच ठिकला. यानंतर इमरान खानने दुसरा विवाह ब्रिटीश पत्रकार रेहाम खानबरोबर केला होता. पण हे लग्न सुद्धा फार काळ टिकले नाही.  आता त्याने हे तिसरे लग्न असल्याची पाकिस्तान माध्यमांच्या वतीने  शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यादरम्यान इम्रानचे बहुतांश महिलांसोबत नाव जोडण्यात आली होती यामध्ये , १९८७ -८८ मध्ये त्याची ओळख सीता व्हाईट या अमेरिकन तरुणीसोबत झाली. तिच्या सोबत देखील त्याचे फार दिवस पटले नाही. तदनंतर १९८०-९० मध्ये इम्रानने झीनत अमान या बॉलिवूडमधली सर्वात बोल्ड अभिनेत्री तिच्याशी देखील इमरान खानचे नाव जोडले गेले होते. मात्र काही दिवसांनी इमरान खानचे पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचा शक्यता वर्तवण्यात आली होती. इमरान खान यांनी ब्रिटीश पत्रकार रेहाम खानबरोबर दुसरा विवाह केला होता. पण हे लग्न सुद्धा फार काळ टिकले नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भाजपच शिवसेना नेतृत्वाला अल्टीमेटम?

मुंबई – केंद्रात आणि राज्यात युतीत असलेल्या शिवसेनेने अनेकवेळा भाजपवर टीका करत एकला चलो रे, ची साद दिली आहे.  मात्र, आज भाजप पक्षश्रेष्ठीनीच शिवसेनेची कोंडी...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी – महादेव जानकर

नांदेड – उत्पन्न वाढीसाठी शेतीसह जोड व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांसह तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल. यासाठी राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन,...
Read More
post-image
महाराष्ट्र

दुष्काळाबाबत लवकरच जीआर काढणार – मुख्यमंत्री

मुंबई – ३१ ऑक्टोबरनंतर राज्यातील तब्बल 179 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
क्रीडा

ही आहे धोनीची नवी स्टाईल

नवी दिल्ली – भारत विरुध्द वेस्टइंडीज यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळण्यात आला, त्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने स्वत:चे काही फोटो सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

फेरीवाला धोरणाची काटेकोर अमंलबजावणी करा – राज ठाकरे

मुंबई – मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून  फेरीवाला धोरणाची आणि त्यातल्या नियमाची काटेकोर अमंलबजावणी करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र...
Read More