इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू – eNavakal
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली इमारतीतील पहिल्या मजल्यावर ही घटना घडली असून घरात झोपलेल्या आई-मुलींवर प्लास्टरचा भाग कोसळला. यात एका मुलीचा मृत्यू झाला असून आईसह दुसरी मुलगी जखमी झाल्या आहेत. मृत मुलीचे नाव साक्षी असे असल्याचे समजते आहे.

या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर उमेश एनगुंदला आपल्या पत्नी (स्नेहा) आणि दोन मुलींसह (साक्षी, प्रगती) दोन वर्षांपासून भाड्याने राहत होते. उमेश कामावरून येऊन इमारतीच्या परिसरात आपल्या मित्रांसह गप्पा मारत बसले होते. यावेळी रात्री अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. उमेश यांची पत्नी आणि मुली घरात होत्या. मुलींपैकी साक्षी हिच्या डोक्यावर आणि छातीवर प्लास्टरचा मोठा भाग पडला त्यातच तिचा मृत्यू झाला. तर आई स्नेहा आणि मुलगी प्रगतीवर प्लास्टरचा कमी भाग पडल्याने त्यांचा जीव वाचला मात्र त्या जखमी झाल्या. या घटनेनंतर साक्षीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More