इंधन समस्या आणि नवे पर्याय – eNavakal
संपादकीय

इंधन समस्या आणि नवे पर्याय

संपूर्ण विश्वाचा व्यवहार हा एका ऊर्जेवर चालू असतो. किंबहुना ही सगळी सृष्टी गतीमान ठेवण्यासाठी सूर्य नावाच्या ऊर्जेचे फार मोठे वरदान निसर्गाने दिले आहे. परंतु जगाला या ऊर्जेचे महत्त्व आता आता लक्षात येऊ लागलेले दिसते. कारण विज्ञान तंत्रज्ञानाने अनेक प्रकारचे शोध लावल्यानंतर माणसाला सुखसोयीसाठी अनेक प्रकारच्या इंधनाची गरज भासू लागली. त्यामध्ये वीज, पेट्रोल डिझेल, नैसर्गिक वायू यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. साठ सत्तर वर्षांपूर्वी लाकूड, कोळसा यासारख्या गोष्टींचा इंधनासाठी वापर व्हायचा. आता जगामध्ये सर्वाधिक वापर पेट्रोल डिझेल या इंधनांचा होतो आणि त्याची जगभर तितकीच मोठी टंचाई जाणवत असते. विशेषत: वाहतूक व्यवस्थेमध्ये पेट्रोल डिझेलचा सर्वाधिक वापर होतो आणि आता नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारे इंधनही अपूरे पडू लागले आहे. हळुहळू कच्च्या तेलाचा साठाही संपू लागला आहे. या इंधनाचे वाढते दर परवडत नसल्याने पर्यायी इंधनाचाही शोध घेणे सुरू झाले.त्यातूनच मग ईलेक्ट्रीकवर चालणार्‍या वाहनांची निर्मिती सुरू झाली. आता तर विमानेसुध्दा ईलेक्ट्रीक बॅटरीवर चालवण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. तरीदेखील पेट्रोल डिझेलचा वापर नियंत्रणात येण्यासाठी बराच कालावधी जाऊ शकतो आणि यासाठी पर्यायी शोध चालूच ठेवावा लागणार आहे मध्यंतरीच्या काळात इथेनॉल या इंधनाचा वापर सुरू झाला आणि आता नीती आयोगाने मिथेनॉलचाही इंधन बचतीसाठी उपयोग करता येईल अशा प्रकारचा प्रस्ताव दिलेला आहे. प्रति लिटर पेट्रोलमध्ये 15 टक्के मिथेनॉल वापरले तर पेट्रोलच्या महिन्याच्या खर्चात दहा टक्के बचत होऊ शकते. अशा प्रकारचा प्रस्ताव नीती आयोगानेच केंद्र सरकारला पाठवला असल्याने लवकर निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत भारतातील वाहन उद्योगांच्या संस्थांशी चर्चा केली जाणार आहे कारण या पेट्रोल मिश्रित मिथेनॉलमुळे वाहनांच्या इंजिनांवर काही परिणाम होणार नाही ना हे तपासणे देखील तितकेच गरजेचे ठरते. परंतु ज्याअर्थी नीतीआयोगाने स्वत: पुढाकार घेऊन शिफारस केली असेल तर याबाबत काही चाचण्या पूर्ण केल्या असण्याची शक्यता आहे.

नीती आयोगाची शिफारस
आजच्या इंधन टंचाईचा आणि पेट्रोल डिझेलसारख्या गोष्टींचा विचार केला तर भविष्यकाळात ऊर्जा किंवा इंधन याबाबत मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. आज भारतातील वाहनांची संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे आणि त्यापोटी सरकारला इंधन खरेदी करताना जवळपास एक लाख कोटींचा भूर्दंडही सोसावा लागत आहे. भारतात पेट्रोल डिझेल हे अन्य देशांच्या तुलनेत खूप स्वस्तात उपलब्ध होते. तिथे त्याच्या किमती खूप प्रमाणात वाढवताही येत नाहीत. परिणामी हा तोट्याचा सौदा भारताला करावा लागतो. म्हणून इथेनॉल, मिथेनॉल यासारख्या गोष्टींना साहाय्यभूत ठरणार्‍या इंधनाचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. नीती आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे मिथेनॉलच्या वापरामुळे खर्चामध्ये दहा टक्के बचत होणार असेल तर तोदेखील फार मोठा दिलासा ठरतो. त्यातून बराच पैसा वाचेल. त्या पैशाचा उपयोग अन्य विकासकामांसाठी करता येऊ शकतो. अर्थातच एकीकडे हा विचार करीत असताना यापेक्षाही जास्त दिलासा देण्याचे काम इलेक्ट्रीक आधारित वाहनांच्या वापरामुळे मिळू शकेल. त्यातून तर प्रदूषणही होण्याची शक्यता नसल्याने त्याबाबत सरकारने अधिक वेगाने प्रयत्न करायला हवेत. 2030 पर्यंत बँकातील सर्व चार चाकी छोट्या गाड्यांची निर्मिती इलेक्ट्रीक आधारित इंजिनच्या स्वरूपातच झाली पाहिजे, असे उद्दीष्ट ठेवले गेले आहे. हे उद्दीष्ट जरी ठरल्याप्रमाणे गाठले गेले तरीसुध्दा पेट्रोल डिझेलसारख्या इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर आटोक्यात येऊ शकतो. सर्व विकसित देशांमध्ये सध्या या इलेक्ट्रीक कार मोटर्सचा सर्वाधिक वापर असल्याचे दिसून येते. यासाठीसुध्दा विजेचीही गरज भासणार आहेच. तुलनेने वीजनिर्मिती करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. कोळसा पाणी, वारा, किंवा सूर्यप्रकाश यासारख्या पर्यांयांचा वापर करता येऊ शकतो.

सौर ऊर्जा महत्त्वाची
म्हणूनच इंधन या घटकाचा विचार करत असताना किंवा पेट्रोल डिझेलसारख्या इंधनाला लगाम घालायचा असेल तर ऊर्जेची पर्यायी साधनेदेखील तितक्याच प्राधान्यक्रमाने उपयोगात आणली गेली पाहिजेत. विशेषत: सौर ऊर्जा हा तर अतिशय स्वस्तातला आणि सहज उपलब्ध होणारा प्रकार ठरतो. जगभरात या सौर ऊर्जेच्या वापरासाठी अनेक संशोधने सुरू आहेत. जगातले अनेक देश एकत्र येऊन सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा विचार करीत आहेत. भारतात कर्नाटकात सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाची अलीकडेच सुरुवात झाली. म्हणजेच भारताने सगळ्या देशांना सौर
ऊर्जेसाठी एकत्र आणले असताना त्यातच पुढाकार घेऊन प्रत्यक्ष कृती करून दाखवली आहे. याची दखल जगाने नाही तर भारतीयांनीसुध्दा घेतली पाहिजे. सरकारने हा सर्वात मोठा सौर प्रकल्प सुरू करताना त्याची सविस्तर माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे. दुर्दैवाने आपल्याच देशातील या गोष्टी आपल्याच देशातील लोकांपर्यंत पोहचत नसतील तर ते आणखीनच दुर्दैवी ठरते. भारतासारख्या देशात 365 दिवसांपैकी 300 दिवस लख्ख सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला तर भारत हा कदाचित जगातील सर्वाधिक सौर ऊर्जा निर्माण करणारा देश ठरू शकेल. म्हणूनच नीती आयोगानेसुध्दा मिथेनॉलसारख्या इंधनाच्या उपयोगाची शिफारस करीत असताना सौर ऊर्जेसारखे आणखी काही करता येईल का. याचाही वेध घेतला पाहिजे. एकीकडे अणूऊर्जेसारखे प्रकल्प जोखमीचे ठरतात. म्हणूनच ऊर्जा निर्मिती करताना जर सौर ऊर्जेचा पर्याय खूपच आशादायक वाटू लागतो. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताला इंधनाच्या बाबतीत अधिक जागरुकपणे विचार केला पाहिजे आणि पर्यायी इंधनांना विकसित करीत असताना सौर ऊर्जेसारख्या पर्यायाला अधिक प्राधान्य दिले पाहिजे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

गॅरी स्टेड नवे प्रशिक्षक

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांचे माजी फलंदाज गॅरी स्टेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिन्यात अगोदरचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांनी...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

पालिका एच-पूर्व कार्यालयाची ‘पाणी वाचवा’ मोहीम कागदावर

मुंबई- पिण्याचे पाणी वाचवा चोरी रोखा पाणी वाया घालवू नका, अशी जनजगृती मोहीम पालिका एच – पूर्व कार्यालयचे पाणी खाते हाती घेणार होते. पण ही...
Read More
post-image
क्रीडा विदेश

मुरलीने ब्लादिमीरला नमवले

अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या मुरली कार्तिकेयनने सातव्या फेरीत रशियाच्या ब्लादिमीरला फेडोसीवला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. या पराभवामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून...
Read More
post-image
News मुंबई

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई – भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील...
Read More