इंधन दरवाढीवरील पोस्टमुळे अभिनेते प्रशांत दामले ट्रोल – eNavakal
News मुंबई

इंधन दरवाढीवरील पोस्टमुळे अभिनेते प्रशांत दामले ट्रोल

मुंबई – इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली असतानाच सलग चौदाव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल महागतच आहेत. विविध देशांतील पेट्रोलच्या दरांविषयी माहिती टाकणारी पोस्ट केल्यामुळे प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत. प्रशांत दामले यांनी शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजून 23 मिनिटांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. आज हाँगकाँगमध्ये पेट्रोलची किंमत आहे 144 रुपये प्रतिलीटर, चीनमध्ये तीच 81 रुपये आहे, तर सिंगापूरमध्ये 110 रुपये इतकी आहे, असे दामलेंनी लिहिले होते. प्रशांत दामले नरेंद्र मोदी समर्थक असून पेट्रोल दरवाढीचे समर्थन करत आहेत, असा समज करुन सोशल मीडिया यूझर्सनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

होर्डिंग लावल्याने कोणाला तिकीट मिळत नाही; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावर बेकायदा होर्डिंग लावण्याचा सपाटा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. या होर्डिंगमुळे...
Read More