इंदौर शहर सलग तिसर्‍यांदा सर्वांत स्वच्छ शहरांच्या यादीत नंबर वन – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

इंदौर शहर सलग तिसर्‍यांदा सर्वांत स्वच्छ शहरांच्या यादीत नंबर वन

नवी दिल्ली – स्वच्छ भारत, सुंदर भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सलग तिसर्‍या वर्षी सर्वात स्वच्छ सुंदर शहर होण्याचा मान मध्य प्रदेशातील इंदौर शहराला मिळाला आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देशातील सर्वात स्वच्छ शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत सुंदर शहरांच्या प्रतिनिधींना गौरवण्यात आले. पहिल्या १० सुंदर शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश आहे. तर स्वच्छतेत राजधानीच्या यादीत मुंबईचा चौथा क्रमांक लागला आहे.

तसेच इंदौरनंतर स्वच्छ शहरांमध्ये छत्तीसगढच्या अंबिकापूरचा दुसरा क्रमांक लागला असून कर्नाटकातील म्हैसूर शहराने तिसरे स्थान पटकावले आहे. यानंतर उज्जैन आणि देशाची राजधानी दिल्ली या यादीत पाचव्या स्थानावर आहे. इतर विभागातील शहरामध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात अहमदाबादचा पहिला क्रमांक लागला आहे. तर वेगाने लोकसंख्या वाढणार्‍या शहरांमध्ये रायपूरचे स्थान पहिले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) पत्रकारांना गुलाम समजण्याचा नेत्यांनी माज करू नये – जयश्री खाडिलकर-पांडे

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या समन्वय बैठकीची माहिती पत्रकारांना कळू नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जो खालच्या पातळीचा हीन प्रकार केला त्याचा ‘नवाकाळ’...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

‘चौकीदार चोर है’ प्रकरणी राहुल गांधींचा माफीनामा सुप्रीम कोर्टाकडून मंजूर

नवी दिल्ली – ‘चौकीदार चोर है’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा माफीनामा मंजूर करण्यात आला आहे. तसेच राहुल गांधी यांनी भविष्यात कोणतीही टिप्पणी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राफेलच्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने राफेल कराराबाबत दाखल झालेल्या पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

सबरीमाला मंदिर प्रवेशाचा निर्णय सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार

नवी दिल्ली – नवी दिल्ली – ऐतिहासिक सबरीमाला प्रकरणावरील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात ३ विरुद्ध २ च्या बहुमताने सात न्यायमूर्तींच्या संविधान पीठाकडे पाठविण्यात आली आहे....
Read More
post-image
विदेश

व्हेनिसला महापुराचा तडाखा; पर्यटकांचे हाल

वेनिस – जगातील सुंदर शहर अशी ओळख असलेल्या व्हेनिस शहराला महापुराने विळखा घातला आहे. इटलीतील या शहराचे महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील जनजीवन...
Read More