इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया – eNavakal
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त फेटाळले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी आपली प्रतिक्रिया देताना इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा असल्याचे वक्तव्य केले आहे.
बाळासाहेब थोरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, इंदुरीकर महाराज हे समाजातील चुकीच्या प्रश्‍नांवर बोट ठेवणारे व्यक्तिमत्त्व आहे. निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा प्रश्‍न आहे. त्यावर मी बोलणार नाही. मात्र त्यांनी पत्रक वाटून राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. उलट त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले आहे. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी मला पाठिंबाच दिला आहे. समाजप्रबोधन करण्याचे त्यांचे मोठे काम असून त्यामुळे अनेक चुकीच्या प्रथा बंद झाल्या असल्याचेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
खरे तर इंदुरीकर महाराज हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत देण्यासाठी व्यासपीठावर गेले होते. परंतु ते व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांच्या जवळ बसून चर्चा करत होते. तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांचे वाकून हात जोडून स्वागत केले होते. या प्रसंगामुळे इंदुरीकर महाराज भाजपात जाणार असल्याच्या चर्चेला
तोंड फुटले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More