इंदिरा गांधी हुकूमशहा असल्याची जेटलींची टीका   – eNavakal
News देश राजकीय

इंदिरा गांधी हुकूमशहा असल्याची जेटलींची टीका  

नवी दिल्ली – भाजपकडून आज आणीबाणी निषेध म्हणून काळा दिवस पाळला जात असतानाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.जेटली यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना हुकूमशहा हिटरल यांच्याशी केली आहे.  यामुळे काँग्रेस आणि जेटली यांच्या वाद होण्याची शक्यता आहे.

सन १९७५ रोजी आजच्याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात आणीबाणी लागू केली होती.  याच्याच निषेधार्थ भाजपने हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला आहे.  याबाबत जेटली यांनी ट्विट करताना इंदिरा गांधी यांची तुलना हिटलरशी केली आहे.  इंदिरा गांधी यांनी स्वतःच्या अधिकाराचा फायदा घेत आणीबाणी लागू केली होती.  आणि सुविधांचा वापर हुकूमशाहीत बदलण्यासाठी केला होता, अशी टीका जेटली यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

हिटलरने स्वतःच्या अधिकारात विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना तुरुंगात डांबले होते. त्यानंतरच त्याने त्याचे अल्पमतातील सरकार बहुमतापर्यंत नेले  होते.  असेही जेटली यांनी म्हटलंय. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी घातल्यानंतर खोडसाळ प्रचारांना मुभा दिल्यास त्याचे सर्वात आधी बळी तुम्हीच ठरता हे आणीबाणीने दाखवून दिले आहे. कारण आणीबाणी लागू करणाऱ्यांना त्यांचाच अपप्रचार खरा असल्याचा भास होऊ लागतो, असं सांगतानाच आणीबाणीच्या काळात देशात भीतीचं वातावरण होतं.  यामुळेच  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विरोधी पक्ष नेते आणीबाणीचा विरोध करत होते. सातत्याने सत्याग्रह होत होते,’ असंही जेटली यांनी म्हंटल  आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

जॅकलीन फर्नांडीसने महाराष्ट्रातील दोन गावे घेतली दत्तक

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, अनेक बॉलीवुड कलाकारांनी गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याचप्रमाणे आपल्या जन्मदिनी (11 ऑगस्ट), जॅकलीन फर्नांडीसने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील दोन गावे,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

मलेशियात आढळला कोरोनाचा नवीन प्रकार, १० पटीने होतोय संसर्ग

जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा नवीन प्रकार मलेशियात सापडला आहे. धक्कादायक म्हणजे या विषाणूचा संसर्ग सध्याच्या विषाणूपेक्षा १० पट अधिक वेगाने होतोय.  या विषाणूचे नाव...
Read More
post-image
मनोरंजन महाराष्ट्र

दिग्दर्शक निशिकांत कामत व्हेंटिलेटवर

हैदराबाद – दिग्दर्शक निशिकांत कामत यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ते उपचारांनाही प्रतिसाद देत असल्याचे सांगण्यात येतंय. काही वेळापूर्वी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मॉल्स उघडली जातात मग मंदिरं का नाही? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

मुंबई – राज्यातील मॉल्स उघडू शकतात तर मग मंदिरं का नाही, असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

दिल्लीत गणपती आणि मोहरमच्या मिरवणुकांवर कोरोनामुळे बंदी

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत यावेळी दिल्लीत मोहरमच्या मिरवणुका आणि गणेश आगमन मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे....
Read More