इंडोनेशियाला भूकंपाचे धक्के! 5.9 रिश्टर स्केल तीव्रता – eNavakal
News विदेश

इंडोनेशियाला भूकंपाचे धक्के! 5.9 रिश्टर स्केल तीव्रता

जकार्ता,- इंडोनेशियात भूकंपाच्या धक्क्याचे सत्र सुरु असून आज लोमबोक बेटाला पुन्हा आज भूकंपाचे तीव्र धक्के बसले. 5.9 रिश्टर स्केल एवढी तीव्रता नोंदवली गेली. या भूकंपाचे केंद्रस्थान माताराम येथून जवळच 23 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती मिळाली आहे.

जमीन हादरताच लोक घर सोडून बाहेर पडले. काही क्षणातच अनेक घरे जमीनदोस्त झाली, अशी माहिती आपत्ती निवारण राष्ट्रीय एजन्सीचे प्रमुख सुतोपो पुर्वो नुगरोहो यांनी दिली. अजूनपर्यंत जीवितहानी झाल्याची कुठलीही माहिती मिळू शकली नाही. यापूर्वीही रविवारी आलेल्या भूकंपात 6.9 रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे बसले होते. यामध्ये जवळपास 168 लोक मृत्युमुखी पडले. तर 1500 गंभीर जखमी झाले होते. तसेच 1 लाख 56 हजार लोकांना विस्थापित केले गेले. यामध्ये कोसळलेल्या हजारो इमारतींच्या खाली पडलेले मृतदेह काढणे अजूनही सुरूच आहे. रविवारच्या भूकंपाआधीही याच परिसरात 6.4 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले होते. यामध्येही 16 लोक मृत्युमुखी पडले तर 355 गंभीर जखमी झाले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

लग्न जुळत नाही म्हणून भावंडांची आत्महत्या

पुणे – खेड तालुक्यातील डेहणे गावामध्ये राहणाऱ्या बहिण-भावाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विषारी औषध घेऊन त्यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

वाकोल्यातील गुजराल इमारतीला आग

मुंबई – वाकोल्यातील गुजराल इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

गोविंदाच्या ‘रंगीला राजा’चा ट्रेलर पाहिलात?

मुंबई – अभिनेता गोविंदाचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘रंगीला राजा ही दोन भावांची गोष्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश हवामान

उत्तराखंडमध्ये गारांसह बर्फवृष्टी

देहरादून – उत्तराखंडमध्ये मागील अनेक दिवसांपासून हवामान सतत बदलत आहे. आजही सकाळपासून हिमालयाच्या उंच पर्वत रांगेवर जोरदार पाऊस कोसळत आहे. बदरीनाथमध्ये बर्फवृष्टी होत आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

मॅच फिक्सिंगप्रकरणी ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरची कबुली

लाहोर – पाकिस्तानी डावखुरा गोलंदाज दानिश कनेरियाने मॅच फिक्सिंगचे आरोप स्विकारले आहेत. मॅच फिक्सिंग प्रकरणात त्याचा सहखेळाडू मर्वेन वेस्टफील्डला तुरुंगवास भोगाावा लागला. कनेरियाने तब्बल...
Read More