इंटरनेट स्लो असेल तरीही व्हीडिओ बघता येणार – eNavakal
तंत्रज्ञान देश

इंटरनेट स्लो असेल तरीही व्हीडिओ बघता येणार

नवी दिल्ली- यूट्यूबने काही महिन्यांपूर्वीच ’यूट्यूब गो’ या अ‍ॅपचे बीटा व्हर्जन जारी केले होते. मात्र, आता हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंटरनेट नसेल किंवा वेग कमी असला तरी या अ‍ॅपवर दर्जेदार व्हीडिओ पाहता येणार आहेत. हे अ‍ॅप 2016मध्ये आयोजित केलेल्या ’मेड फॉर इंडिया’ कार्यक्रमात लाँच करण्यात आले होते.
या अ‍ॅपवर दर्जेदार व्हीडिओ सेव्ह करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यावर व्हीडिओ पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी कमी डेटा खर्च होतो. व्हीडिओ ऑफलाइन पाहण्यापूर्वी त्याचं पूर्वावलोकनही करता येणार आहे. तसेच डाऊनलोड केलेले व्हीडिओ इंटरनल मेमरी किंवा एसडी कार्डमध्येही सेव्ह करता येतील. तसेच ब्लूटूथनेद्वारे शेअरही करणे शक्य होणार आहे. वाय-फाय तंत्रज्ञानाद्वारेही ते शेअर करता येतील. या अ‍ॅपची साइज 10 एमबीपेक्षा कमी असून ते अँड्रॉइडवर 4.2 किटकॅट किंवा त्याहून अधिक असलेल्या व्हर्जनवर सुरू होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

माहुलमधील पुनर्वसन हायकोर्टाने रोखले

मुंबई – शहर आणि उपनगरांना पाणी पुरवाठा करणार्‍या तानसा मुख्य जलवाहीन्यांजवळील झोपड्यांवर कारवाई केल्यानंतर त्यांचेे माहूल ऐवजी अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यास अपयशी ठरलेल्या आणि...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

बँक कर्मचार्‍यांचा दोन दिवसांचा संप मागे

मुंबई – बँक कर्मचार्‍यांनी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी पुकारलेला संप अखेर मागे घेण्याची घोषणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने त्यांच्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मेकअप बॉक्स वाटल्याप्रकरणी प्रणिती शिंदेेंच्या अडचणीत वाढ

सोलापूर – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी कॉँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतरही मेकअप बॉक्सचे वाटप केले असल्याचा आरोप...
Read More
post-image
News देश

शिमल्यात सफरचंदाहून महाग झाला कांदा

देहरादून – हिमालयवासीयांना देखील कांद्याने यावर्षी रडविले आहे. हिलस्टेशन शिमल्यामध्ये कांदा सफरचंदाहून महाग झाला आहे. पंधरा दिवसांपासून कांद्याच्या भावात लाक्षणीय वाढ झाली आहे. 40...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एमआयएमचे दरवाजे बंद आहेत! पुण्यात प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

पुणे – विधानसभा निवडणुकीकरिता युती करण्यासाठी एमआयएमकडून दरवाजे बंद आहेत. मात्र, वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर...
Read More