इंजिनीयर्स व वकिलांनी विकली मोदींच्या सभेत तळलेली भजी – eNavakal
News देश

इंजिनीयर्स व वकिलांनी विकली मोदींच्या सभेत तळलेली भजी

चंदिगड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेत्री किरण खेर यांच्या प्रचारासाठी चंदिगडमध्ये भव्य मेळावा घेतला. त्या मेळाव्यामध्ये इंजिनीयर्स आणि कायद्याच्या पदवीधरांनी ‘मोदी पकोडे’ (मोदी भजी) विकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या इंजिनीयर्स व वकील विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक करून व्हॅनमध्ये डांबले. त्यामुळे मोदींच्या मेळाव्यात एकच गोंधळ उडाला.
हे इंजिनीयर्स व वकील विद्यार्थी आपले पदवीदानाच्या वेळी परिधान केलेले काळे गाऊन घालून मेळाव्याच्या ठिकाणी भजी तळून विकत होते. विद्यार्थ्यांचे हे अभिनव आंदोलन सुरू होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर उपस्थित होते. हे विद्यार्थी सांगत होते की, ‘पकोडा’ योजनेअंतर्गत मोदींनी आम्हाला रोजगार दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यासाठीच आम्ही त्यांचे स्वागत करायला येथे आलो आहोत. आम्ही पंतप्रधान मोदींच्या सभेमध्ये भजी विकू पाहात आहोत. त्यामुळे मोदींना कळेल की भजी विकणे किती कठीण काम आहे ते! मात्र हे अभियंता व वकील भजी विकत असताना पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने उचलून पोलीस व्हॅनमध्ये डांबले व मोदींची सभा संपल्यावर या विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More