ऑस्ट्रेलियाचा पराभव करून इंग्लंड अंतिम फेरीत – eNavakal
News आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

ऑस्ट्रेलियाचा पराभव करून इंग्लंड अंतिम फेरीत

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दुसर्‍या सामन्यात यजमान इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयाबरोबरच इंग्लंडने पहिल्या टप्प्यातील झालेल्या पराभवाचा बदलादेखिल घेतला. चौथ्यांदा या स्पर्धेची इंग्लंडने आता अंतिम फेरी गाठली आहे. रविवारी त्यांचा मुकाबला न्यूझीलंडशी होईल. त्यामुळे यंदा क्रिकेट विश्वाला नवा जगग्गेता मिळणार आहे. विजयासाठी 224 धावांचे छोटे लक्ष्य इंग्लंडसमोर होते. ते त्यांनी 33 व्या षटकांत सलामीची जोडी रॉय-बेअरस्टो यांचे बळी गमावून सहज पार केले. रॉयने 85 तर बेअरस्टोने 34 धावा केल्या. रूट 49, कर्णधार मॉर्गन 45 धावा काढून नाबाद राहिला.
यजमान इंग्लंडसमोर 224 धावांचे आव्हान ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या ऑस्ट्रेलियाचा डाव 49 षटकांत अवघ्या 223 धावांत आटोपला. त्यांचा माजी कर्णधार स्मिथने काढलेल्या दमदार 85 धावांमुळे ऑस्ट्रेलियाला 200 धावांचा टप्पा गाठता आला. त्याला यष्टीरक्षक कॅरीने 46, मॅक्सवेलने 22 आणि स्टार्कने 29 धावा काढून चांगली साथ दिली. इंग्लंडतर्फे वेगवान गोलंदाज व्होक्सने 3 आणि फिरकी गोलंदाज राशीदने देखील 3 बळी घेतले. आर्चरला 2 तर वूडला 1 बळी मिळाला. स्मिथ दुर्दैवीरित्या धावचित झाल्यामुळे त्याचे शतक हुकले. तर कर्णधार फिंचला भोपळादेखिल फोडता आला नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शाळेच्या परीक्षेची वेळ बदलून उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची सभा

उस्मानाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी शाळेच्या परीक्षेची वेळ बदलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचाच...
Read More