इंग्लंडचा विंडीजवर 8 गडी राखून दणदणीत विजय – eNavakal
News क्रीडा विदेश

इंग्लंडचा विंडीजवर 8 गडी राखून दणदणीत विजय

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान इंग्लंडने आजच्या विंडीजविरुद्धच्या लढतीत 8 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. विजयासाठी अवघे 213 धावांचे लक्ष्य इंग्लंडसमोर होते. ते त्यांनी 34 व्या षटकांत बेअरस्टो, वोक्सचे बळी गमावून सहज पार केले. शतकी खेळी करणारा सलामीवीर रुट अणि प्रत्येकी तीन बळी घेणारे आर्चर-वूड त्यांच्या विजयाचे शिल्पकार होते. शतकी खेळी करणारा रुट सामनावीर ठरला.
त्याअगोदर इंग्लिश कर्णधार मॉर्गनने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली होती. गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी करून आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविला. वेस्ट इंडिजचा संघ 44.4 षटकांत 212 धावांतच गारद झाला. त्यांची सुरुवातदेखील खराब झाली. सलामीवीर लुईस 2 धावा काढून माघारी परतला. त्यानंतर गेल आणि होपने दुसर्‍या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून त्यांचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
ही जमलेली जोडी प्लंकेटने गेला 36 धावांवर बाद करून फोडली. गेलला 16 धावा असताना वूडकडून जीवदानदेखील मिळाले होते. पण त्याचा फायदा गेलला घेता आला नाही. त्यानंतर होपलादेखील मार्क वूडने 11 धावांवर माघारी पाठविले.
मग पुरण आणि हेटमेयरने चौथ्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करून पुन्हा त्यांचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हेटमेयरला रूटने 39 धावांवर बाद करून विंडीजला चौथा धक्का दिला.
हेटमेयरने 48 चेंडू खेळताना 4 चौकार मारले. त्यानंतर मात्र विंडीजची पुन्हा घसरगुंडी उडाली. कर्णधार होल्डर 9 आणि रसेल 21 धावा काढून बाद झाले. जम बसलेला पुरणला आर्चरने 63 डावांवर बाद केले. त्याने 78 चेंडू खेळताना 3 चौकार आणि 1 षटकार मारला.
आर्चरने पुरण आणि शेल्डनला बाद करून हॅट्ट्रिककडे वाटचाल केली होती. पण गॅब्रियलने आर्चरची हॅट्ट्रिक हुकवली. इंग्लंडतर्फे आर्चर आणि मार्क वूडने प्रत्येकी 3 बळी घेतले. तर रूटला 2 आणि वोकस, प्लंकेटला प्रत्येकी एक बळी मिळाला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश मुंबई

पेट्रोल-डिझेल आजही महागले; पाहा आजचे दर

मुंबई – सौदी अरबमध्ये झालेल्या हल्यांनंतर जगभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. देशात आजही पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर २९...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहारमध्ये जाऊन चिदंबरमना भेटले

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज तिहार कारागृहात जाऊन ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई – देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन कंपनी करात कपातीची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच शेअर बाजाराने प्रचंड मोठी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – मिसेस कोहली अर्थात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती

केंद्रीय वाणिज्य आणि रेल्वे मंत्री यांना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि त्यांनी मुंबईकर कसे संयमी आहेत, असा पलटवार करून वेळ मारून नेली. परंतु...
Read More