आसामच्या जंगलात ‘लादेन’ दाखल! 5 जणांना ठार मारले – eNavakal
News देश

आसामच्या जंगलात ‘लादेन’ दाखल! 5 जणांना ठार मारले

गुवाहाटी – ‘अल कायदा’ या खतरनाक दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला अमेरिकन नौदल सैनिकांनी पाकिस्तानात ठार मारून आठ वर्षे उलटले आहेत. मात्र आता आसाममध्ये अशाच ‘लादेन’ नावाची दहशत निर्माण झाली आहे. हा ‘लादेन’ दुसरा तिसरा कुणी नसून पिसाळलेला हत्ती असून त्याने आसामच्या जंगलात पाच निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे. गेल्या काही दिवसापासून हा ‘लादेन’ आसामच्या गोलापोरा जिल्ह्यातील जंगलात दाखल झाला आहे. तब्बल आठ वनअधिकार्‍यांचे पथक या ‘लादेन’ जंगली हत्तीचा शोध घेत आहे. गोलापोरातील सतबारी जंगलाचा प्रत्येक भाग ‘ड्रोन’ कॅमेर्‍याच्या सहाय्याने पिंजून काढला जात आहे. हा ‘लादेन’ कुणालाही सापडलेला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असताना शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्याला...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊत यांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश जावडेकरांना अतिरिक्त भार

नवी दिल्ली – शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूर केला असून अरविंद सावंत यांच्याकडे असलेल्या अवजड उद्योग...
Read More