आशियाई स्पर्धेसाठी भारताचा तलवारबाजी संघ सज्ज – eNavakal
क्रीडा देश

आशियाई स्पर्धेसाठी भारताचा तलवारबाजी संघ सज्ज

नवी दिल्ली – बँकॉक येथे होणाऱ्या आशियाई तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय तलवारबाजी संघ १५ जून रोजी  रवाना होणार आहे. या संघात २४ पुरुष, महिला खेळाडूंचा समावेश आहे. साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात भारतीय तलवारबाजी संघाची निवड चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीतून निवडण्यात आलेल्या खेळाडूंचे सराव शिबिर घेण्यात आले. बँकॉक येथे आशियाई तलवारबाजी स्पर्धा १७ ते २२ जून या कालावधीत होणार आहे.

भारतीय संघात विनोथ कुमार, थोकचोम बिकी, अर्जुन, राकेश राय, सुनील कुमार, एन. संतोष सिंग, जयप्रकाश कोपारा, उदयवीरसिंग, करणसिंग, के. पद्म गिशो निधी, आय. सुरेंद्र सिंग, जे. वरिंदर सिंग, राधिका अवटी, एस. बिंदू देवी, डब्ल्यू. थोईबी देवी, जास्मिन, कबिता देवी, एना अरोरा, जससिरत सिंग, ज्योतिका दत्ता, टी. डायना देवी, कोमलप्रीत शुक्ला, जोस जोस्त्ना, भवानी देवी या खेळाडूंचा समावेश आहे. संघासमवेत बाटनोव्ह ओलेग, विजय कुमार, अश्विनी मोहित शर्मा, लागू सागर सुरेश, अश्विनी कुमार, हरीप्यारी देवी, रोशन थापा, देविका न्यायाधीश, बशीर अहमद खान, संजय नवले अशा प्रशिक्षक, व्यवस्थापक टीमचा समावेश आहे.

भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता, सचिव बशीर अहमद खान, कोषाध्यक्ष अशोक दुधारे, साई केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, राज्याचे सचिव डॉ. उदय डोंगरे, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, दिनेश वंजारे, डॉ. दयानंद कांबळे, राजिंदर पठाणिया, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, तुकाराम म्हेत्रे, संजय भुमकर, गोकुळ तांदळे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, सागर मगरे, शरद कचरे आदींनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण

मँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत.  रोहित शर्माने विश्‍वचषक स्पर्धेतील...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More