आशियाई कुस्ती स्पर्धेत साजनची बाजी – eNavakal
News क्रीडा

आशियाई कुस्ती स्पर्धेत साजनची बाजी

नवी दिल्ली – दक्षिण कोरियात सुरू असलेल्या ज्युनियर आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या साजनने 77 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून भारताचे सुवर्णपदकाचे खाते उघडले. त्याने ग्रीकोरोमन प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. या अगोदर त्याने ज्युनियर आशियाई आणि ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत कास्यपदकांची कमाई केली होती. त्यामुळे सुवर्णपदक आपल्यासाठी खूप मोलाचे असल्याची प्रतिक्रिया साजनने दिली. येणार्‍या भावी काळात अशी सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचा मानसदेखील त्याने व्यक्त केला. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी प्रशिक्षकांना दिले. त्याने सांगितल्याप्रमाणेच आपण या स्पर्धेत खेळल्याचे तो म्हणाला. 55 किलो वजनी गटात इराणच्या मोहम्मदकडून भारताच्या विजयाला अंतिम सामन्यात हार खावी लागली. तर 130 किलो वजनी गटात आर्यनला इराणच्याच अमिनकडून पराभव पत्करावा लागला. 87 वजनी गटात सुनील आणि 63 किलो वजनी गटात मंजीतला कास्यपदकावर समाधान मानावे लागले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश वाहतूक

केंद्र सरकार खासगी रेल्वे चालकांना स्थानक निवडण्याचे स्वातंत्र्य देणार

नवी दिल्ली – देशातील खासगी रेल्वे चालकांना हव्या त्या स्थानकावर थांबण्याचे स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय ट्रान्सपोर्टरने प्रसिद्ध केली आहे. तसेच देशात १५० खासगी...
Read More
post-image
देश

संसदीय अधिवेशनाच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सदने जोडणार

नवी दिल्ली – जगभरात कोरोनाचे संकट असतानाही येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांनी सर्व...
Read More
post-image
देश विदेश

भारतीय तटरक्षक दलाचे १० जणांचे पथक तेलगळती रोखण्यासाठी मॉरिशसला रवाना

नवी दिल्ली – मॉरिशसच्या दक्षिण-पूर्व तटवर्ती क्षेत्रात झालेली तेलगळती आटोक्यात आणण्यासाठी भारताने ३० टन तांत्रिक उपकरणे आणि साहित्य भारतीय हवाई दलाच्या विमानाने मॉरिशसला पाठविले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

दोघा भावांना कोरोनाची लागण! ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार सेल्फ क्वारंटाईन

मुंबई – बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या दोघा भावांना कोरोनाची लागण झाली आहे. एहसान खान आणि असलम खान यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

सांगली, रत्नागिरीत मुसळधार; कृष्णा, काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ

सांगली – पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. याठिकाणी...
Read More