आलोक नाथ यांनी असभ्य वर्तन केले, अभिनेत्री संध्या मृदूलचा गंभीर आरोप – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

आलोक नाथ यांनी असभ्य वर्तन केले, अभिनेत्री संध्या मृदूलचा गंभीर आरोप

मुंबई  – देशभरात ञ्च् चश ढेे चळवळ वेगाने पसरत असून विनिता नंदा यांच्या आरोपांनंतर आता अभिनेत्री संध्या मृदूलनेही आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संध्या हिच्या आरोपांनंतर आलोक नाथ यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आलोक नाथ मला सर्वांसमोर मुलीसारखे वागवायचे, मात्र त्यांच्या संस्कारी चेहर्‍यामागे असभ्य पुरुषाचा चेहरा दडला आहे. चित्रीकरणाच्या काळात त्यांनी मला वारंवार फोन करून मानसिक त्रास दिला. माझ्या रूममध्ये येऊन असभ्य वर्तन केले असे अनेक गंभीर आरोप संध्याने केले आहेत.

संध्या मृदुलनं ट्विट करत तिच्यासोबत आलोक नाथ यांनी केलेल्या गैरवर्तणुकीला वाचा फोडली आहे. आलोक नाथ यांच्याविषयी मला खूपच आदर होता. या क्षेत्रात तेव्हा मी नवीन होते. त्यांच्या चांगुलपणामुळे आणि माझ्याप्रती असलेल्या चांगल्या वर्तनामुळे मी खूपच प्रभावित झाले. ते नेहमीच सेटवर मला मुलीसारखे वागवायचे. माझ्या कामाचे कौतुक करायचे, मात्र एकदिवशी त्यांचा खरा चेहरा माझ्यासमोर आला. असं ट्विट करत पुढचे काही दिवस आलोक नाथ यांनी कसा आपला मानसिक छळ केला हे तिने ट्विटर पोस्टमधून उघड केले आहे.

दरम्यान, अलोक नाथवर विनता नंदाने बलात्काराचा आरोप केला होता. आता अशी माहिती मिळते की, या आरोपानंतर अलोक नाथची तब्येत बिघडली आहे.अलोक नाथ यांची तब्येत बिघडल्यामुळे मीडियाने सहकार्य करावे अशी विनंती अलोक नाथचे वकिल अशोक सरावगीने म्हटले.
कैलाश खेरवरही गैरवर्तनाचा आरोप

सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहापात्राने दिग्गज गायक कैलाश खेरवर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. मुंबईत एका कॅफेमध्ये कॉन्सर्टविषयी बोलण्यासाठी आम्ही भेटलो. त्यावेळी कैलाश यांनी माझ्या मांडीवर हात ठेवला. बरे झाले, एखाद्या अभिनेत्याऐवजी तू संगीतकाराला जोडीदार म्हणून लाभलीस, असे कैलाश खेर म्हणताच मी तत्काळ निघून गेले, पण त्यांना फरक पडला नाही, असा दावा सोनाने केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मराठीत बोलायला सांगितल्याने कुरियर बॉयचा तरुणींवर हल्ला

मुंबई – आज सकाळी 11.30 वाजता दादरच्या न.चिं. केळकर रोडवरील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या पेडणेकर भगिनींच्या घरी कुरियरवाला आला. या भगिनींनी कुरियरद्वारे स्वामी समर्थांची पुस्तके मागविली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात पबजीवर बंदी आणण्याचा विचार

भोपाळ – अलिकडे स्मार्ट मोबाईल फोनवर पबजी खेळ खेळण्याचा जीवघेणा छंद वाढीस लागला आहे. हा खेळ खेळता खेळता अनेकांना त्याचे व्यसन लागत आहे. त्यामुळे तरुणाईला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

‘क्रोकोडाइल हंटर’ स्टीव्ह यांना गुगलची आदरांजली

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. स्टीव्ह इरविन यांना ‘क्रोकोडाइल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना उत्तर प्रदेशात अटक

सहारनपूर – सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथून जैश ए मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. या संशयितांकडून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

प्रियांका-फरहानच्या ‘स्काय इज पिंक’ची तारीख ठरली

मुंबई – अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता फरहान अख्तर यांचा आगामी चित्रपट ‘स्काय इज पिंक’ कधी प्रदर्शित होणार याविषयी चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. पण आता...
Read More