आर्थिक मंदीचा जबर फटका भारतालाच बसणार! नाणेनिधीचा इशारा – eNavakal
News विदेश

आर्थिक मंदीचा जबर फटका भारतालाच बसणार! नाणेनिधीचा इशारा

वॉशिंग्टन – संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या विळख्यात सापडले असून या मंदीचा सर्वात जबरदस्त फटका भारताला बसणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे हाती घेताना ख्रिस्टलिना जॉर्जिइव्हा यांनी हा इशारा दिला आहे. मोेदी सरकार ‘फाईव्ह ट्रिलियन’ अर्थव्यवस्था बनविण्याच्या आणि 9 टक्के विकासदर गाठण्याच्या बाता मारत असतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने हा इशारा दिला आहे.
ख्रिस्टलिना जॉर्जिइव्हा यांनी सांगितले की, जगातील व्यापारी वाढ अक्षरश: थांबली आहे. पुढील वर्षात या आर्थिक मंदीचा सर्वात जास्त फटका भारत आणि ब्राझील यांना बसणार आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर हा 0.3 ते 7 टक्क्यांच्या मध्ये हेलकावे खात राहील. याच काळात उपभोक्त्यांची मागणी प्रचंड खालावणार आहे. ख्रिस्टलिना जॉर्जिइव्हा यांनी जगाला धोक्याचा इशारा देताना सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून जग आर्थिक मंदीच्या विळख्यात जात आहे. अमेरिका व चीन यांच्यातील व्यापारी युद्धाचा जगाला फटका बसला आहे. खुद्द अमेरिकेत आणि जर्मनीत प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. जागतिक आर्थिक मंदी ही पुढील 10 वर्षे टिकणार आहे. गेल्या दोन वर्षांतील खुंटलेला विकास व व्यापारी दराचा फटका पुढच्या वर्षीही जाणवत राहतील. भारतात हे परिणाम तीव्रतेने जाणवतील.ख्रिस्टलिना जॉर्जिइव्हा यांचा हा इशारा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
भारतातही गेल्या दोन वर्षांपासून बंद होणारे उद्योगधंदे, वाढलेली बेरोजगारी आणि महागाई ही सर्व या भयानक आर्थिक मंदीचे लक्षणे आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
कोरोना मुंबई

ठाण्यात १५४ नवे रुग्ण, ८२ रुग्णांनी केली कोरोनावर मात

ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा  (coronavirus)आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज एका दिवसांत तब्बल १५४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ठाणे शहरांतील एकूण...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत आज चौघांचा मृत्यू, ३८ नव्या रुग्णांची भर

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासांत ३८ नवीन कोरोना (corona) रुग्णांची भर पडली आहे तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना मुंबई

धारावी, माहिम, दादरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच!

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली आहे. मुंबईच्या धारावीत कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू असून याठिकाणी दररोज नवे रुग्ण आढळत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

चिंता वाढतेय! राज्यात आज ६० मृत्यू, २ हजार ४३६ नवे रुग्ण

मुंबई – देशासह राज्यात कोरोनाचं (coronavirus)थैमान सुरुच आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या पार गेली आहे. आज राज्यात नव्या २ हजार 4३६ रुग्णांची भर पडली....
Read More
post-image
कोरोना देश

रेल्वे भवनातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण, दोन दिवस भवन राहणार बंद

नवी दिल्ली – रेल्वे भवनातील काही अधिकाऱ्यांना कोरोनाची(coronavirus) बाधा झाल्याने २६ आणि २७ मे दरम्यान रेल्वे भवन बंद राहणार आहे. या काळात रेल्वे भवनात...
Read More