आर्थिक निकषावर आरक्षण द्या – उद्धव ठाकरे – eNavakal
News आघाडीच्या बातम्या

आर्थिक निकषावर आरक्षण द्या – उद्धव ठाकरे

मुंबई – आर्थिक निकषावर आरक्षण द्या पण आहे ते आरक्षण  रद्द करू नका अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.  मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजत असून यावर राज्य शासनाने लवकर तोडगा काढला पाहिजे.  यासाठी शासनाने धटना दुरुस्तीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा असे ते म्हणाले.  तसेच राज्य मागास आयोगाच्या अहवालाची वाट  न पाहता तातडीने विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण जाहीर करण्याचा सल्ला राज्य सरकारला देत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी यावेळी केला आहे.   राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका असावी यासाठी मुंबईत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आमदारांची मातोश्रीवर एक बैठक बोलावली होती.  त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेनेचे आमदार, मंत्री आज संध्याकाळी ४ वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More