आरोग्यदायी गणेशोत्सवासाठी घरपोच मिळणार पौष्टिक मोदक – eNavakal
आरोग्य महाराष्ट्र

आरोग्यदायी गणेशोत्सवासाठी घरपोच मिळणार पौष्टिक मोदक

मुंबई – गणपतीचा आवडता प्रसाद मोदक. खरंतर मोदक आवडत नाही असं म्हणणारी व्यक्ती विरळच. गुळ-खोबऱ्याचं सारण असलेला उकडीचा मोदक म्हणजे क्या बात. संकष्टी-अंगारकीला मराठी घरातून हक्काने तयार होणारा असा हा पदार्थ. अलिकडे या पदार्थावर अनेक प्रयोग होत आहेत. त्यापैकी एक म्हणजे चॉकलेटचे मोदक. साधारणपणे मिठाईच्या दुकानात मिळतात ते माव्याचे मोदक असतात. यांत अजून एक मोदक आपलं स्थान निर्माण करू पाहत आहे तो म्हणजे जस्ट इट फूड्सचे हेल्दी मोदक.
हेल्दी मोदक म्हणजे मावा, स्टार्च, साखर, आरारूट, कृत्रिम रंग या सारख्या आरोग्यास अपायकारक असणाऱ्या घटकांचा वापर न करता तयार करता येणारा मोदक. डॉ. विद्या क्षीरसागर यांनी आरोग्याच्या दृष्टीने सखोल संशोधन करून हे हेल्दी मोदक तयार केले आहेत. गहू, हिरवे मूग, गूळ, तीळ, शुद्ध गायीचं तूप यांपासून हे मोदक तयार केले जातात. वेलची आणि जायफळाच्या स्वादात हे मोदक उपलब्ध आहेत. या मोदकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ३० दिवसापेक्षा जास्त हे मोदक टिकतात.  त्यामुळे घरी प्रसाद म्हणून देण्यासाठी आणि बाहेरगावी घेऊन जाण्यासाठी योग्य आहेत. अलिकडे माव्याची मिठाई खाऊन लोकांना विषबाधा झाल्याचे सर्रास वाचावयास मिळते. तसेच स्टार्च, साखर, आरारूट सारखे शरीराला अपायकारक आहे. त्यामुळेच हे घटक जरासुद्धा या मोदकामध्ये वापरले जात नाहीत.
डॉ. विद्या क्षीरसागर यांची सकस फुडच्या ‘जस्ट इट’ फूड्स अंतर्गत मोदक तयार करतात. या व्यतिरिक्त हेल्दी स्नॅक्स, एनर्जी बार जे आरोग्यास हितकारक असतात त्याची निर्मिती करतात. जवळपास १० महिला येथे कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील महिलांना रोजगार देण्यासाठी सकस फुडसचा प्रयत्न चालू आहे. निव्वळ भारतातच नव्हे तर जगभरात हे मोदक पोहोचले आहेत. अगदी घरबसल्या देखील ऑनलाईन हे मोदक उपलब्ध आहेत. घरपोच मोदक मिळविण्यासाठी  www.justeatfoods.com संकेतस्थळावर भेट द्या. तेव्हा यंदाचा गणेशोत्सव हेल्दी साजरा करण्यासाठी डॉ. विद्या क्षीरसागरांचे हेल्दी मोदक जोडीला असलेच पाहिजेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

निम्म्या कोल्हापुरात आज पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर – महापालिकेकडून कावळा नाका येथे पाण्याच्या टाकीखालील पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम आज सोमवारी हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या टाकीवर अवलंबून असलेल्या भागातील पाणीपुरवठा बंद...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आजपासून कुलभुषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली – कुलभषण जाधव यांना पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज सोमवार 18 फेब्रुवारी पासून जाहीर सुनावणी सुरू होणार आहे. द हेग...
Read More
post-image
संपादकीय

(संपादकीय) अरे…सांत्वनाचे सौजन्य तरी पाळा

देशाच्या एकजूटीचे बळ कितीतरी प्रचंड असू शकते. हे अभूतपूर्वरीतीने दिसून आले आहे. सव्वाशे कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येचा हा देश अनेक राज्य, अनेक भाषा, धर्म, पंथ,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या व्हिडीओ

कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (१८-०२-२०१९)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (०६-०१-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२९-०१-२०१९) कसा आहे तुमचा आजचा दिवस...
Read More
post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More