आरे कारशेडचा अहवाल राज्य सरकारसाठी बंधनकारक नाही, आदित्य ठाकरे – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय

आरे कारशेडचा अहवाल राज्य सरकारसाठी बंधनकारक नाही, आदित्य ठाकरे

मुंबई – सत्तेवर आल्यावर आरेच्या कत्तलांना धडा शिकवू असे आश्वासन देणाऱ्या ठाकरे सरकारची आता खरी कसोटी लागणार आहे. कारण, आरे कॉलनीतीलच जागा कारशेडसाठी योग्य असल्याची शिफारस केल्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. या अहवालावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचला असून हा अहवाल राज्य सरकारसाठी बंधनकारक नसल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

समितीने आरे कारशेडचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला असला, तरी देखील तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहिलेला नाही. हा अहवाल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पोहोचला आहे. हा अहवाल अजून पूर्ण आलेला नाही. आता त्या अहवालाचा अभ्यास करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. कारशेडचे काम आरेमध्ये त्याच ठिकाणी सुरू करावे अशी शिफारस समितीने केली असून ही स्थगिती उठवून लवकरच त्याच ठिकाणी कारशेडचे काम सुरू करावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हे काम स्थिगित केले गेल्याने दररोज ५ कोटी रुपयांचे नुकसान होत असून हे नुकसान टाळण्यासाठी सरकारने तत्काळ पावले उचलून काम सुरू करावे असे आवाहनही फडणवीस यांनी केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश

इक्वाडोरच्या गल्लीत पडली 150 प्रेते, लोक त्यांच्याजवळ जायलाही घाबरतात

क्विटो – कोरोनाच्या महामारीने जगातील 200 देशांना विळखा घातला आहे. अमेरिकेपाठोपाठ लॅटिन अमेरिकेतील इक्वाडोर या लहानशा देशातही कोरोनाने थैमान घातले आहे. या देशातील गुयाक्विल...
Read More
post-image
विदेश

कोरोनाचा राग मोबाईल यंत्रणेवर

बर्मिंघम – करोनाच्या वाढत्या संसर्गाप्रमाणे काही देशांना सोशल मीडियातून फैलावणाऱ्या फेक न्यूजचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियातून करण्यात येणाऱ्या विविध दाव्यांमुळे प्रशासकीय यंत्रणांसमोर आव्हान...
Read More
post-image
देश

कोरोनाग्रस्ताचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी

नवी दिल्ली – दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात एका कोरोनाच्या संशयित रुग्णाने रुग्णालयाच्या तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढ्या उंचावरून उडी...
Read More
post-image
देश

तेलंगणात नवे 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले

हैदराबाद – तेलंगणा राज्यातही कोरोनाचे संकट वाढले आहे. तिथे नवे 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असले तरी सुदैवाने गेल्या 24 तासांमध्ये एकाची मृत्यू झालेला नाही....
Read More
post-image
देश

डॉक्टरांवर हल्ला झालेल्या इंदुरमध्ये सापडले १० कोरोना रुग्ण

इंदूर – मध्य प्रदेशातील मिनी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदुरमध्ये कोरोनाचे नवे १० रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी डॉक्टरांचे एक पथक या...
Read More