आरेवारे समुद्रात 6 जण बुडाले 5 जणांचा मृत्यू; एकजण बचावला – eNavakal
महाराष्ट्र

आरेवारे समुद्रात 6 जण बुडाले 5 जणांचा मृत्यू; एकजण बचावला

रत्नागिरी – रत्नागिरीतील आरेवारे समुद्रात सहा पर्यटक बुडाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. यातील 5 जणांचे मृतदेह सापडले असून एकाला वाचवण्यात यश आले आहे. तर एकाचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. हे सर्व पर्यटक डिसुझा कुटुंबातील मुंबईतील बोरिवली येथील रहिवाशी आहेत.
रत्नागिरीतील आरेवारे समुद्र हा पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. शनिवार, रविवार आल्याने येथे पर्यटकांनी गर्दी केली होती. आज दुपारच्या सुमारास समुद्राला भरती होती. त्यातच हे सहा पर्यटक समुद्रात उतरले. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते लाटेसोबत पाण्यात ओढले गेले. त्यातच 5 जणांचा मृत्यू झाला. तर एकाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. केनेथ टिमोथी मास्टर्स (56), मोनिका बेंटो डिसुझा (44), सनोमी बेंटो डिसुझा (22), रेंचर बेंटो डिसुझा (19) आणि मॅथ्यू बेंटो डिसुझा (18) अशी बुडून मृत झाललवल्यांची नावे आहेत. तर लिना केनेथ मास्टर असे या दुर्घटनेत बचावलेल्या मुलीचे नाव आहे. या पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेेदनासाठी पाठवण्यात आले होते.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More