आरेच्या डोंगराला आग लावली; अग्निशमनचा अहवाल – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

आरेच्या डोंगराला आग लावली; अग्निशमनचा अहवाल

मुंबई – गेल्या काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथील आरे कॉलनीमधल्या डोंगराला लागलेल्या आगीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अखेर बुधवारी अग्निशामक दलाने जाहीर केलेल्या अहवालातून आरे कॉलनीतील आग ही जाणीवपूर्वक लावण्यात आली होती, असे स्पष्ट झाले आहे. या अहवालात आरेच्या डोंगरावर अनधिकृतरीत्या काही समाजकंटकांचा वावर असावा, अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

३ डिसेंबर रोजी आरेच्या डोंगरावर लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल 14 तास लागले होते. या आगीतून संशयाचा धूर येत असल्याचा आरोप वन्यप्रेमी आणि स्थानिकांनी केला होता. त्यामुळे आता अग्निशमन दलाच्या अहवालामुळे पर्यावरणवादी संघटना, येथे राहणारे आसपासचे नागरिक यांनी यापूर्वी केलेल्या आग लावण्याच्या आरोपाला शिक्कामोर्तब झाले आहे. अहवालातील नमूद केल्यानुसार, आरेच्या डोंगरात गैरपद्धतीने येथील प्रतिबंधित क्षेत्रात काही माणसांचा वावर झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आग विझल्यानंतर केलेल्या तपासादरम्यान आग लागलेल्या ठिकाणी अर्धवट जळालेले टायर्स, बाटल्या, प्लॅस्टिक आढळून आले आहे. तसेच डोंगराला लागलेल्या मोठ्या आगीनंतरही तेथील काही भागावर आगीचा कोणताही परिणाम झालेला नव्हता, हे संशय निर्माण करणारे असल्याचे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राहुल गांधींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. आज वीरेंद्र कुमार यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून शपथ...
Read More
post-image
देश

#CycloneVayu २४ तासांत अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरात आणि मुंबईसह कोकणावरील धोका टळला आहे. मात्र हे वादळ गुजरातच्याच दिशेने पुढे जाईल, असे हवामान खात्याने...
Read More
post-image
विदेश

वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगच्या प्रमुखांनी मागितली माफी

हाँगकाँग – वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाला सरकारने स्थगिती दिली असतानाही काल रविवारी हाँगकाँगमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी हाँगकाँग नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन आरोग्य देश

ममता बॅनर्जींसोबत चर्चेसाठी डॉक्टर रवाना

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सोमवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार...
Read More
post-image
देश

एक देश, एक निवडणूक! मोदींनी बोलावली बुधवारी बैठक

नवी दिल्ली – प्रचंड बहुमत व देशाच्या सत्तेवर पूर्णपणे पकड निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक हादरवणारा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. ‘एक...
Read More