आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे खातेधारकांचे नुकसान टळले! हायकोर्टाने व्यक्त केले मत – eNavakal
News मुंबई

आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे खातेधारकांचे नुकसान टळले! हायकोर्टाने व्यक्त केले मत

मुंबई – पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी खातेदारांचे पैसे बुडाले नाहीत, तर आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे ते टळले, असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाने आज व्यक्त केले. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने रिझर्व्ह बॅँकेच्या अहवालानंतर हे मत व्यक्त केले.
आरबीआयने घातलेल्या निर्बंधांमुळे पीएमसी बँकेतील खातेदारांना आपल्या खात्यातून रक्कम काढण्यात अनेक अडचणी येत आहेत. या शिवाय पीएमसी बँकेच्या घोटाळ्यामुळे आतापर्यंत चार खातेदारांचा मृत्यू झाला आहे. आरबीआयने पीएमसी बँकेवर घातलेले निर्बंध हटवावेत तसेच ग्राहकांना आपल्या खात्यातून जास्तीत जास्त रक्कम काढण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी करत प्राजक्ता वायकर यांच्यावतीने तमसीन मोनिस यांनी तर कंन्झूमर अ‍ॅक्शन नेटवर्क, हरेश रायसिंगानी यांच्यासह तीन आणि एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्या याचिकांवर आज सुनावणी झाली. यावेळी बॅँक खातेधारकांनी आता शेतकर्‍यांप्रमाणे आत्महत्या करायच्या का?, असा सवाल काही खातेधारकांनी हायकोर्टात केला होता. कोर्टाने समिती स्थापन करून कर्जबुडव्या एचडीआयएलकडून जप्त केलेल्या मालमत्तेचा लवकरात लवकर लिलाव करत पीएमसी खातेधारकांची सर्व रक्कम परत करण्याची तजवीज करावी, अशी प्रमुख मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली. यावेळी न्यायालयाने आरबीआयने पीएमसी खातेधारकांचे पैसे बुडवले हा आरोप चुकीचाच असल्याचा पुनरूच्चार केला. याचिकाकर्त्यांच्यावतीने आज युक्तीवाद पूर्ण झाला असून उद्या आरबीयाच्या वतीने अंतीम युक्तीवाद करण्यात येणार आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुण्यात पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे मुख्यमंत्री ठाकरेेंनी केले स्वागत

पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे आज रात्री 9 वा. 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रोटोकॉलनुसार...
Read More
post-image
News क्रीडा देश

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय

हैद्राबाद- कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या तुफानी 94 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 6 गडी आणि 8 चेंडू राखून सहज विजय मिळविला. टी-20...
Read More
post-image
News देश

अखेर मोहम्मद अझरुद्दीनच्या स्टॅँडचे अनावरण

हैदराबाद- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून टी-20 सामन्याला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतराष्ट्रीय मैदानावर पार पडला. हा सामना...
Read More
post-image
News मुंबई

शरद पवार आणि उद्धव ठाकरेेंची एकांतात खातेवाटपाबाबत चर्चा

मुंबई – आज दिल्लीतून आलेल्या शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वरळीच्या नेहरु सेेंटरमध्ये एकांतात बैठक झाली. खुप दिवस रखडलेल्या सहा मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत...
Read More