आरटीआयचा दुरुपयोग करुन बिल्डरकडे खंडणी मागणार्‍याला अटक व कोठडी – eNavakal
News गुन्हे

आरटीआयचा दुरुपयोग करुन बिल्डरकडे खंडणी मागणार्‍याला अटक व कोठडी

मुंबई- आरटीआयचा दुरुपयोग करुन गोवंडीतील एका बिल्डरकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी प्रशांत शंकर गुडेकर या 46 वर्षांच्या आरटीआय कार्यकर्त्यांला सोमवारी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला येथील स्थानिक न्यायालयाने 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस तपासात त्याने अशाच प्रकारे बिल्डराविरुद्ध तक्रार करुन तक्रार मागे घेण्यासाठी खंडणीची मागणी केल्याचे बोलले जाते. तक्रारदार ते व्यवसायाने बिल्डर असून त्यांचे गोवंडी परिसरात काही एसआरए प्रकल्पातंर्गत येणार्‍या इमारतीचे बांधकाम सुरु आहेत. याच परिसरातील प्रशांत गुडेकर हा त्यांच्याविरुद्ध गेल्या चार वर्षांपासून महानगरपालिका, एसआरए आणि महारेसा कार्यालयात तक्रारी करीत होता. या तक्रारीमुळे या बिल्डरच्या अनेक इमारत प्रकल्पातील काम बंद पडले होते. त्यातच रेसा कायद्यांतर्गत त्यांना स्थानिक रहिवाशांना एप्रिल 2019 पर्यंत घराचा ताबा देणे अनिवार्य होते, मात्र या तक्रारीमुळे त्यांना नाहक त्रास झाला होता. संबंधित कार्यालयात त्यांनी त्यांची बाजू मांडून स्टॉप वर्कची नोटीस रद्द करुन घेतली, मात्र प्रशांत गुडेकर हा पुन्हा तक्रारी करुन त्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत होता. याच दरम्यान प्रशांतने या बिल्डरच्या एका कॉन्ट्रक्टरमार्फत शासकीय कार्यालयात तक्रारी न करण्यासाठी 80 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. त्यापैकी एक लाख रुपये आधी घेतले, उर्वरित साडेबारा लाख रुपयांसाठी तो त्यांना सतत धमकी देत होता. अखेर त्यांनी खंडणीविरोधी पथकात प्रशांत गुडेकरविरुद्ध तक्रार केली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
लेख

वत्तविहार : मराठीचा न्यूनगंड कायम

महाराष्ट्र सरकारला आपल्याच मातृभाषेचे महत्त्व समजत नसेल तर या सरकारच्या बुध्दीची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच आहे. विशेषतः शिक्षण विभागाने मराठीबाबत जो काही खेळखंडोबा...
Read More
post-image
देश

भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार! सुरुवात ‘आयआरसीटीसी’पासून

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या पाच ‘रेल्वे सेवांपैकी’ एक आहे. मोदी सरकारने भारतीय रेल्वेचे आता खाजगीकरण करायचे ठरविले आहे. कमी गर्दीच्या आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार! मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असून या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, मुरुडसह 40 गावांमधील ग्रामस्थांचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सावजी हॉटेलना मिळणार दारूचा परवाना

नागपूर – नागपूर येथील प्रसिद्ध सावजी हॉटेलांमध्ये व धाब्यांवर दारू विकण्यास उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे आता नागपुरात कायदेशीरपणे मद्यविक्री केली जाईल....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पवईत हॉटेलला आग; अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी

मुंबई – पवईतील हिरानंदानी परिसरात हॉटेलला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. देव कोरडकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून...
Read More