आरक्षण उठले असले तरी आळंदीला दर्शन रांग त्याच ठिकाणी – eNavakal
News मुंबई

आरक्षण उठले असले तरी आळंदीला दर्शन रांग त्याच ठिकाणी

मुंबई,- आळंदीं येथील मंदिरा जवळील ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी जवळीलदर्शनरांग आणि अग्नीशमनदलासाठी राखीव असलेलया भुखंडावरील आरक्षण उठविले असले तरी कार्तिकी एकादशीला याचा भुखंडावर दर्शन रांगेची व्यवस्था करावी असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेर यांच्या खंडपीठाने हे निर्देश सर्व प्रतिवादींच्या संमत्तीने देतानाच 17 डिसेंबर पर्यंत या भुखंडासंदर्भात जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले.

या परीसरात आषाढी आणि कार्तिकी एकादशी दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने या भाविकांना दर्शन घेणे सोईस्कर व्हावे म्हएून आळंदी नगरपालीकेने दुसर्‍या विकास आराखड्यात सर्व्हे क्रमांक 127 (7) (ब) चा सुमारे 78 गुठ्यांचा भूखंड दर्शन मंडप आणि अग्नीशमनदलासाठी आरक्षण निश्चित केले.. राज्य सरकारने 2013 मध्ये त्याला मान्यता ही दिली. दरम्यान या भूखंडावरील आरक्षण उठविण्यात यावे असा थेट अर्ज गुलाबराव महाराज सर्वोदय ट्रस्टचे अघ्यक्ष नारायणरा व मोहोड यांनी 2015 मध्ये मुख्यमंत्र्यांकडे केला. याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी त्यावर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्या नुसार नगरविकास खात्याने नगरपालीकेला आरक्षण उठविण्याबाबतचा ठराव करण्याचा आदेश दिला .मात्र नगरपालीकेने ठराव करण्यास विरोध दर्शविला. अखेर नगरविकास खात्याने स्वत:च्या अधिकारात सहाय्यक संचालक पुणे विभाग यांची नियुक्ती करून आरक्षण उठविण्याचा प्रस्ताव तयार करून हरकती आणि सूचना मागविल्या. त्यानंतर जानेवारी 2018 मध्ये भुखंडावरील हे आरक्षण उठविण्याचा निर्णय घेतला. त्या विरोधात माजी विरोधी पक्षनेते डी.डी. भोसले पाटील आणि एम.डी भोसले पाटील यांच्यावतीने अ‍ॅड. नितीन देशापांडे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More