आरएनए बिल्डरचे ऑफिस सील – eNavakal
न्यायालय मुंबई

आरएनए बिल्डरचे ऑफिस सील

मुंबई – मुंबईत वांद्रे पूर्व भागात असलेले आरएनए बिल्डरचे ऑफिस सील करण्यात आले आहे. देना बँकेचे ४५ कोटींचे कर्ज थकवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी २९ सप्टेंबर रोजी कमिशनर आणि वकिलांनी या ३ मजली इमारतीचा छत आणि तळमाजल्यासह ताबा घेतला.

देना बँकेने २०१७ मध्ये मूळ कर्जदार अनिल कुमार अग्रवाल यांच्या संपत्तीचा ताबा घेण्यासाठी महानगर न्यायदंडाधिकार न्यायालयात धाव घेतली. बँकेने दावा केला होता की, वांद्र्यातील आरएनए कॉर्पोरेट पार्क आणि त्याच्या हेड ऑफिससाठी २०१० मध्ये ६५ करोडचे कर्ज मंजूर केले होते. १ ऑक्टोबर २०१६ साली ४५ कोटींच्या आसपास रक्कम जमा करावी, अशी नोटीस बँकेकडून कर्जदारांना पाठविण्यात आली होती. त्यासाठी ६० दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र कर्ज फेडण्यास त्यांना अपयश आले अखेर बँकेने न्यायालयाकडे मालमत्तेच्या ताब्याची मागणी केली.

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? यावरून...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

भारतीय हॉकी संघ पराभूत

भुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको

जयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...
Read More