आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट ‘नंबर वन’ – eNavakal
News क्रीडा

आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट ‘नंबर वन’

दुबई – आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीने अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे. विराटने ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथला मागे टाकून प्रथमच या क्रमवारीत पहिला क्रमांक पटकाविला. इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराटने शानदार खेळी करताना पहिल्या डावात शतक आणि दुसर्‍या डावात अर्धशतक फटकाविले होते. त्याच्या या जबरदस्त खेळीचा फायदा विराटला या क्रमवारीत मिळाला. विराटने स्मिथला 5 गुणांनी मागे टाकले आहे. सध्या ऑस्ट्रेलियन कर्णधारावर चेंडू कुरतडल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने 1 वर्षाची आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्यास बंदी घातली आहे. या क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळविणारा विराट केवळ सातवा भारतीय फलंदजा ठरला आहे. या आगोदर सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, गौतम गंभीर, सुनील गावसकर, विरेंद्र सहवाग, दिलीप वेंगसकर हेदेखील या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होते. विराटचे 934 गुण झाले असून गुणांच्या आधारे तो या क्रमवारीत 14 व्या स्थानावर आहे. जून 2011 मध्ये सचिन तेंडूलकर या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होता. त्यानंतर आता विराट ‘नंबर वन’ झाला आहे. वन-डे आणि टी-20 सामन्यात या आगोदरच विराट या क्रमांकावर राहिला आहे. विराटने इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्या कसोटीप्रमाणेच राहिलेल्या सामन्यात तशीच कामगिरी केली तर या क्रमवारीत गुणांच्या आधारे तो पहिल्या दहा फलंदाजांमध्ये येऊ शकतो.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरला पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर – मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या पालघरमध्ये आजही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही मात्र आतापर्यंत जाणवलेल्या धक्क्यांमुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

मोदी ‘या’ दिवशी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक २०१९चे निकाल काल जाहीर झाले. भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने सर्वसामान्यांसह सर्वांनाच थक्क केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीएने देशात...
Read More