आयसीसीने केलं ‘ट्रोल’, सचिनने दिलं ‘असं’ उत्तर – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

आयसीसीने केलं ‘ट्रोल’, सचिनने दिलं ‘असं’ उत्तर

मुंबई – एकेकाळी भारतीय संघातील ‘जय-विरू’ म्हणून ओळखली जाणारी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या मैत्रीचे किस्से सर्वांना माहीत आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर सचिनने विनोद कांबळीसह Tendulkar-Middlesex Global Academy च्या माध्यमातून नवीन खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. नुकतच सचिनने नवी मुंबईत नवोदीत खेळाडूंना क्रिकेटचे धडे दिले. या सराव शिबीराचा एक व्हिडीओ सचिन तेंडूलकरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.  या व्हिडीओमधील तेंडुलकरच्या गोलंदाजीवरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्याला ट्रोल केले.

या व्हिडीओवर आयसीसीने, पंच स्टिव्ह बकनर यांचा फोटो टाकत सचिनला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. सचिनने क्रिजच्या पुढे जाऊन गोलंदाजी केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ही चूक आयसीसीने सचिन तेंडुलकरसोबत स्टीव्ह बकनर यांचा ‘नो बॉल’ देतानाचा फोटो ट्वीट करून रिप्लाय केला. मात्र सचिननेही आपल्या नेहमीच्या शैलीत आयसीसीला सडेतोड प्रत्युत्तर देत सर्वांची मनं जिंकली आहेत. बरं झालं यावेळी फलंदाजी नाही तर गोलंदाजी करत आहे. मात्र अम्पायरचा निर्णय नेहमी अंतिम असतो, असा सचिनने आयसीसीच्या ट्वीटला रिप्लाय दिला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सोज्वळ अभिनेत्री उमा भेंडे

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ३१ मे १९४५ साली कोल्हापूर येथे झाला. सोज्वळ अभिनेत्री म्हणून उमा भेंडे यांनी मराठी रसिक मनावर...
Read More
post-image
देश

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता! ३६ हजाराच्या घरात जाणार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोने महागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरच्या सातपाटी परिसरात यंदा पापलेटच्या उत्पादनात घट

पालघर – राज्यासह जगभरात निर्यात होणार्‍या पालघरच्या सातपाटी परिसरातील पापलेट या मत्स्याच्या प्रकारामध्ये यंदा प्रचंड घट झाली आहे. पापलेटचे उत्पादन गेल्या हंगामापेक्षा 190 टनांनी घटले...
Read More
post-image
देश

मनोहर पर्रिकरांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद

पणजी – गोव्यामधील मिरामार बीचवर गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी गोव्याच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात...
Read More