आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोकणचा सुपुत्र आहे विराजमान – eNavakal
महाराष्ट्र

आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोकणचा सुपुत्र आहे विराजमान

कोकणचे सुपुत्र आणि आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर हे रविवारी चक्क सहकुटुंब, सहपरिवार आपल्या मूळ गावी परतले.

कोकणातील मालवण तालुक्यात असलेल्या आपल्या वराड गावी आल्यानंतर त्यांनी ग्रामदैवत देव वेतोबाचे दर्शन घेतले आणि अस्सल मालवणी जेवणाचा आनंदही घेतला.

त्यांचे गावात आगमन झाल्यावर वराडवासीय अक्षरशः भारावून गेले. त्यांना पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमली होती.

कोकणाचा सुपुत्र चक्क आयर्लंडचा पंतप्रधान? एकून सर्वांनाच आश्चर्य वाटते. मात्र त्यांची कहाणीही तशीच आहे.

लिओचे वडील डॉक्टर अशोक वराडकर हे 1960 साली इंग्लडला गेले. ते तेथील सरकारी सेवेत डॉक्टर म्हणून रुजू झाले. बर्कशायर परगण्यातील स्लाव्ह या गावी त्यांचं तेथील एका रुग्णालयात काम करत असलेल्या मिरीयम या आयरिश नर्ससोबत प्रेम झालं. या दोघांनी लग्न केलं.

लग्नानंतर दोघेही आयर्लंडलाच स्थायिक झाले. त्यांनी तिथेच आपला दवाखाना सुरू केला. या दाम्पत्याच्या पोटी 18 जानेवारी 1979 साली लिओ वराडकरांचा जन्म झाला. लिओ यांनी लहानपणी आयर्लंडचा आरोग्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं. भविष्यात हे स्वप्न सत्यात उतरवत ते आरोग्यमंत्री झाले. आरोग्यमंत्री म्हणून उत्तम कामगिरी बजावून 2017 साली ते आयर्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. 38 वर्षीय लिओ हे आयर्लंडचे सर्वांत तरुण पंतप्रधान ठरले आहेत.

मुख्य म्हणजे लिओ यांनी 2015 साली आपण समलिंगी असल्याचे जगासमोर मान्य केले. ते आयर्लंडचे पहिले समलिंगी पंतप्रधान आहेत. 2015 साली त्यांनी मॅथ्यू बॅरेट याच्याशी विवाह केला. सध्या दोघांचा सुखाचा संसार सुरू आहे.

मालवणात आल्यावर लिओ यांनी आनंद व्यक्त केला. गावकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, भारतात मी पाच वेळा आलो, मात्र माझे आजोबा, वडील राहतात त्या वराड गावी येण्याचा योग पहिल्यांदाच आला असून गावात येऊन मला अतिशय आनंद झाला आहे. माझे आडनाव या गावाशी जोडले आहे, याचा आनंद असून आम्ही वराडकर कुटुंबीय गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू, तर आमच्या गावची एक व्यक्ती भेट आयर्लंडच्या पंतप्रधान पदावर बसली, याहून वेगळा आनंद तो काय, अशी भावना यावेळी वराडकरांनी व्यक्त केली.

असे म्हणतात की, कोकणात राहणारा माणूस जगात कुठेही असो त्याची नाळ कोकणाशी जुळलेली असते, याचंच उत्तम उदाहरण म्हणजे लिओ वराडकर.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More