आयपीलएलच्या पहिल्या दोन आठवडयांचे वेळापत्रक जाहीर – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आयपीलएलच्या पहिल्या दोन आठवडयांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई – यंदाच्या 12 व्या आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दोन आठवड्यात होणार्‍या सामन्यांचे वेळापत्रक आज बीसीसीआयतर्फे जाहीर करण्यात आले. येत्या 23 मार्च पासून यंदाच्या या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. सलामीची लढत गतविजेत्या चेन्नई आणि बंगळुरू संघात होणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. त्यानंतर स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी कोलकाताविरुद्ध हैद्रराबाद आणि दिल्लीविरुद्ध मुंबई यांच्यातील लढती कोलकाता, मुंबई येथे रंगणार आहेत.

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धां यंदा मे-जूनमध्ये इंग्लंडमध्ये होणार असल्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेला लवकर प्रारंभ होणार आहे. आयपीएल दरम्यान भारतात लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आयपीएलचे सामने भारतात होणार की नाही, याबाबत साशंकता होती. पण बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी आयपीएलचे सर्व सामने भारतातच होतील असे मत व्यक्त केले होते. पण त्यांनी वेळापत्रक जाहीर केले नव्हते. सध्याच्या सरकारचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार असून त्यानंतर निवडणूका होतील. त्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्याची तारेवरची कसरत आता बीसीसीआयला करावी लागणार आहे. त्यामुळे पहिल्या दोन आठवड्याचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले. लोकसभा निवडणुकीच्या तारख्या जाहीर झाल्यानंतर बीसीसीआय आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करणार होते. पण आज अचानक आयपीएल वेळापत्रकची बीसीसीआयने घोषणा केली. आताच्या स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार चेन्नई, कोलकाता, मुंबई, जयपूर, दिल्‍ली, बंगळुरू, हैद्राबाद, मोहाली या ठिकाणी स्पर्धेतील सुरुवातीचे सामने रंगणार आहेत. दुपारचे सामने 4 वाजता आणि रात्रीचे सामने 8 वाजता सुरू होतील. यंदा दिल्ली संघाने आपल्या संघाचे नाव बदले असून, दिल्ली कॅपीटल या नावाने हा संघ स्पर्धेत खेळणार आहे. तर शेन वॉर्न राजस्थान संघाचा ब्रॅड अम्बेसेडर म्हणून काम पाहणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण

मँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत.  रोहित शर्माने विश्‍वचषक स्पर्धेतील...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More