हिमांशू रॉय यांची सुसाईड नोट पोलिसांच्या ताब्यात – eNavakal
News गुन्हे मुंबई

हिमांशू रॉय यांची सुसाईड नोट पोलिसांच्या ताब्यात

मुंबई – राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू राॅय यांनी आज दुपारी त्यांच्या दक्षिण मुंबईतील राहत्या घरी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्त्या केली आहे. संपूर्ण पोलीस दलाला हादरवून टाकणारी अशी ही घटना आहे. कर्करोग या दुर्धर आजाराने ते त्रस्त होते. या दीर्घ आजारपणाला कंटाळूनच  त्यांनी आत्म्हत्त्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते. हिमांशू रॉय यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून तोंडात गोळी मारुन आत्महत्या केली. तोंडातून गोळी आरपार झाल्यामुळे, त्यांचा चेहऱ्याला जबर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. बॉम्बे रुग्णालयातून हिमांशू रॉय यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जीटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आज रात्री 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज १ वाजताच्या  हिमांशू रॉय (54) यांनी नरिमन पॉईंट  येथील  सुनिती अपार्टमेंटमधील राहत्या घरी रिव्हॉल्व्हरने स्वतःच्या जबड्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या केली, त्यांना बॉम्बे हॉस्पिटल येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी 1.47 वा. दाखलपूर्व मयत घोषित केले. याप्रकरणी कपपरेड पोलीस ठाण्यात अपघाती  गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हे १९८८ बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी महाराष्ट्राचे एटीएस प्रमुख म्हणून जबाबदारी बजावली होती. सध्या त्यांचे हाऊसिंग डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते आणि ते तिथेच रमले होते. १९९३चा मुंबई बॉम्बस्फोट आणि आयपीएल प्रकरणामधील त्यांनी बजावलेली कामगिरी उल्लेखनीय होती. त्यांनी लैला खान हत्त्या प्रकरण आणि जे. डे. हत्त्याप्रकारणाचा तपास करून यशस्वीरीत्या छडा लावला होता.

 

हिमांशू रॉय याच्या करियरचा आढावा

१९८८ बॅचचे आयपीएस अधिकारी

> अनेक हायप्रोफाईल प्रकरणांचा छडा लावण्यात यश

> आयपीएल मॅच फिक्सिंग, जे. डे. हत्या, पल्लवी पुरकायस्था हत्याकांड,  लैला खान हत्या प्रकरणाचा यशस्वी तपास

> १९९५ साली नाशिक ग्रामीण भागाचे पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी

> अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जबाबदारी पार पाडली

> पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा

> पोलीस उपायुक्त वाहतूक, पोलीस उपायुक्त झोन-१,

> नाशिक शहर पोलीस आयुक्त (२००४-२००७)

> मुंबईत सहपोलीस आयुक्त म्हणून २००९ साली नेमणूक

> महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून नेमणूक

> अतिरिक्त पोलीस महासंचालक (नियोजन आणि समन्वय)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo भूषण कुमारांविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

मुंबई – ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत देशात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर आली. यात टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आता मुंबईच्या ओशिवारा पोलीस...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरारोड येथे ३ सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

मीरारोड – मीरा-भाईंदर महापालिकेच्या मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्रातील सेप्टिक टँकची सफाई करत असताना मीरारोड येथील तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुजफ्फर मोहलिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज बचावाची आशा, मात्र एतिहादच्या कठोर अटी

मुंबई – आर्थिक अडचणींमुळे डबघाईला येऊन बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या जेट एअरवेजला एतिहाद एअरलाईनच्या नव्या प्रस्तावामुळे जिवंत राहण्याची आशा निर्माण झाली आहे. एतिहाद एअरलाईन ही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

राज्यात डान्सबार पुन्हा सुरू होणार

मुंबई – राज्यभरात डान्सबार पुन्हा सुरू करावे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने साडेपाच तास डान्सबार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच डान्सबारमध्ये...
Read More
post-image
गुन्हे देश

नवापूरच्या अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये अत्याचार

नंदुरबार – नवापूर येथील अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या तीन आरोपींवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित...
Read More