आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांचे मोदींना पत्र – eNavakal
News देश

आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांचे मोदींना पत्र

अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2002 च्या गुजरात धार्मिक दंगलीला आशीर्वाद होता, असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करणारे आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना जन्मठेपेचे शिक्षा झाली आहे. त्यांनी तुरुंगातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारे खरमरीत पत्र पाठविले आहे. त्यांनी लिहिले आहे. मोदीजी, तुम्ही माझी कवटी फोडा, मला जिवंत जाळा, तरी मी अन्यायाविरुद्ध लढेन! तुम्ही माझ्या हाडांचा चुराडा करा, मला जिवंत गाडा, तरीही मी अन्यायाविरुद्ध लढेन!
1990 मधील एका कैद्याच्या कोठडीतील मृत्यूला 30 वर्षांनंतर संजीव भट्ट यांना जबाबदार धरून जामनगर न्यायालयाने संजीव भट्ट यांना आजीवन जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
मोदींच्या विरोधात नानावटी आयोग, अल्पसंख्यांक आयोग व सर्वोच्च न्यायालयात साक्ष आणि प्रतिज्ञापत्र सादर केल्याची ही शिक्षा असल्याचे मत आयपीएस अधिकार्‍यांना वाटते. संजीव भट्ट हे गुजराती आयपीएस अधिकारी आहेत. मात्र त्यांनी धर्म, जात, प्रांत बाजूला ठेवून आपली ड्युटी बजावली. त्याचा हा सूड असल्याचे संजीव भट्ट यांना वाटते.
ते पत्रात म्हणतात, मोदीजी तुमच्या सल्लागारांनी तुम्हाला चुकीची माहिती देऊन तुमची दिशाभूल केली आहे. त्यानंतर तुम्ही 6 कोटी गुजराती बांधवांची दिशाभूल केली. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांनी म्हटले आहे की, कुठेही अन्याय झाला तर तो सर्व ठिकाणच्या न्यायाला धोका निर्माण करतो. तुमच्याकडे सत्ता आहे, मात्र नीतितत्त्व नाहीत. माझ्याकडे नीतितत्त्व आहेत, परंतु सत्ता नाही. तुम्ही तुम्ही आहात, मी मी आहे. त्यामुळे समझौता होऊ शकत नाही. त्यामुळे लढाई सुरू होऊ दे. माझ्याकडे सत्य आहे, मात्र माझ्याकडे बळ नाही. तुमच्याकडे बळ आहे, पण सत्य नाही! संजीव भट्ट यांच्या पत्राने फार मोठी खळबळ माजली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

बुलढाण्यात कारमध्ये गुदमरून दोन मुलांचा मृत्यू

बुलढाणा – कारमध्ये गुदमरून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुलढाण्यात घडली आहे. तर एक पाच वर्षांची चिमुकली गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More