आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार – eNavakal
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय संयुक्त सचिव रुबेन मस्कारेन्हास यांनी ही घोषणा केली आहे.
रुबेन यांनी म्हटले की, मागील विधानसभा निवडणुकीत जनतेने सत्तापालट केल्यानंतर आताचे सत्ताधारी भाजप-शिवसेना ही युती राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय आघाडीवरही अपयशी ठरली आहे. एकेकाळी पुढारलेले राज्य म्हणून ख्याती असलेला महाराष्ट्र आज दुष्काळ, पूर, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी, ढासळलेली कायदाव्यवस्था अशा अनेक प्रश्नांनी बेजार झाला आहे. महाराष्ट्र सरकार कुठल्याच बाबतीत ठोस निर्णय घेताना दिसत नाही आणि दुसरीकडे विरोधी पक्ष आत्मविश्वासच गमावून बसला आहे. सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडण्याऐवजी विरोधी पक्ष स्वतःच गोंधळलेल्या स्थितीत आहे. महाराष्ट्राच्या समोर असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या ‘आप मॉडेल’ मध्ये आहेत. तोच संकल्प घेऊन आम्ही राज्यात जास्तीत जास्त जागांवर निवडणुका लढवण्याचा निश्चय केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग तंत्रज्ञान

तुमच्याकडेही आहे का नवी संकल्पना? मोदींनी तरुणांना दिलंय नवं चॅलेंज

नवी दिल्ली – देशात सध्या चीनविरोधी वातावरण असल्याने चिनी उत्पादनांवर बंदी घालण्यात येतेय. तसंच, भारत सरकारनेही चीनच्या ५९ अॅपवर बंदी घातली आहे. त्यामुळे चीनची...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : भारताचा मानाचा तुरा पी.व्ही सिंधु

आज बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही सिंधूचा वाढदिवस. तिचा जन्म ५ जुलै १९९५ झाला. पी. वी. सिंधूचे पुसर्ला वेंकट सिंधू हे पूर्ण नाव. पी.व्ही.रामण्णा आणि पी.विजया या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर वाढला, समुद्राला तुफान भरती

मुंबई – काल दिवसभरात पावसाने मुंबईला झोडपून काढले,. महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने कालपासून पुन्हा बरसायला सुरुवात केली असून रविवारीही पावसाने आपली बॅटींग सुरूच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दिल्ली, जम्मूनंतर आता महाराष्ट्रातही भूकंपाचे धक्के, ‘या’ जिल्ह्यात जाणवले हादरे

सातारा – देशभर विविध राज्यात भूकंपाचे धक्के जाणवत असताना आता महाराष्ट्रातही भूकंपाचे हादरे बसायला लागले आहेत. साताऱ्यातील कोयना परिसरात २.६ रिश्टर तीव्रतेचे भकंपाचे धक्के...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील अपघातात मुलासह आई-वडिलांचा मृत्यू

वाशिम – नागपूर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.  हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चक्काचूर झाला....
Read More