आम्ही स्वबळावर लढण्यास सज्ज आहोत- पर्यावरण मंत्री रामदास कदम – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

आम्ही स्वबळावर लढण्यास सज्ज आहोत- पर्यावरण मंत्री रामदास कदम

शिर्डी – येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केल्यानंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी त्यावर स्वत्ताचं मत मांडल आहे. ते शिर्डीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपने युती तोडली होती, पण 25 वर्षे जुनी युती होती, म्हणून आम्ही त्यांच्या मागे मागे करत होतो, पण त्यावेळेला त्यांच्याकडे मोदी होते, म्हणून भाजपने  शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला होता. या पाच वर्षात सरकारकडून काय कामगिरी झाली आहे, हे जनतेच्या समोर आहे आणि हे भाजपही जाणून आहे, त्यामुळे भाजप आता शिवसेनेच्या मागे युतीसाठी लागली आहे. पण आपण आता स्वबळावर लढणार आहोत, आणि संपूर्ण महाराष्ट्रात भगवा फडकवणार आहोतम अस भाष्य त्यांनी पत्रकारांशी बोलताना केलं.

केंद्र आणि राज्य शासनाकडून शिवसेनेला जी काम अपेक्षित होती, ती त्यांच्याकडून झालीच नाहीत, त्यामुळे हा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आदिवाशी मुलांचे प्रश्न,  मराठा, धनगर, मुस्लीम यांच्या आरक्षणाचे प्रश्न जैसे थे आहेत.हे सगळे विषय जनतेच्या समोर मांडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये रामदास कदम यांनी दिली आहे. २१ ऑक्टोबरपासून उद्धव ठाकरे राज्यात ४८ ठिकाणी कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहेत. याची सुरवात ते शिर्डीतून करतील अशीही माहिती रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More
post-image
देश

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

मुंबई – आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर...
Read More
post-image
महाराष्ट्र

साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर दिब्रिटोंच्या निवड, विहिंपकडून विरोध

उस्मानाबाद – 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. याला विश्व हिंदू परिषदेने...
Read More