‘आम्हाला तुमच्या राजकीय भूमिकेत रस नाही’, राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने फटकारले – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक न्यायालय

‘आम्हाला तुमच्या राजकीय भूमिकेत रस नाही’, राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने फटकारले

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चौर है’ वक्तव्यावर सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली होती. यावर आज सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना ‘आम्हाला तुमच्या राजकीय भूमिकेत रस नाही’, असे फटकारले आहे.

सुप्रीम कोर्टाने राफेलच्या कागदपत्रांवर निर्णय दिल्यानंतर, ‘सुप्रीम कोर्टदेखील म्हणत आहे की, चौकीदार चोर हैं’, या राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात भाजपने आक्षेप घेतला होता. मीनाक्षी लेखी यांनी निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली. या याचिकेवर राहुल गांधी यांनी २२ एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली होती. राहुल गांधी यांनी कोर्टात २२ पानी प्रतिज्ञापत्र सादर करत दिलगिरी व्यक्त केली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी माफी मागण्यासाठी तुम्हाला २२ पानी प्रतिज्ञापत्राची गरज भासते का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांच्या वकिलांना विचाराला. राहुल गांधी यांच्या  ‘चौकीदार चौर है’ या वक्तव्यावर राहुल गांधी यांचे वकिल अभिषेक मनू सिंघवी हे स्पष्टीकरण देत होते. यावेळी ‘आम्हाला तुमच्या राजकीय भूमिकेत रस नाही तुमची भूमिका तुमच्याकडेच राहू द्या’, असे सुप्रीम कोर्टाने सुनावले. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

राज्यातील महापूर प्रशासकीय गलथानामुळे आरोप करणारी जनहित याचिका हायकोर्टात

मुंबई – कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही प्रशासकीय गलथानपणा आणि धरणातील पाणी सोडण्यासंदर्भात केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांचे बेदरकार उल्लंघन झाल्याचा आरोप करून कर्नाटक...
Read More