‘आम्हाला चर्चा नको, जीआर द्या’ – मूकबधिर आंदोलक – eNavakal
आघाडीच्या बातम्या आंदोलन महाराष्ट्र

‘आम्हाला चर्चा नको, जीआर द्या’ – मूकबधिर आंदोलक

पुणे – आपल्या विविध न्याय हक्काच्या मागण्यांसाठी पुणे येथील समाजकल्याण आयुक्तालयावर मोर्चा घेऊन आलेल्या मूकबधिरांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना सोमवारी घडली. पोलिसांच्या लाठीचार्जमुळे आंदोलकांत संताप निर्माण झाला आहे. या लाठीचार्जमध्ये काही मूकबधीर विद्यार्थी जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून अहवाल सादर करा, असे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत. तर ‘आम्हाला चर्चा नको, जीआर द्या’, या मागणीवर आंदोलक ठाम आहेत. दरम्यान, लाठीचार्ज झाल्यानंतर पोलिसांनी बेफाम झालेल्या विद्यार्थ्यांना आवरण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. लाठीचार्ज झाला नसल्याचे सांगितले. हे आंदोलन रात्रभर सुरूच होते.

आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मूकबधिर तरुणतरुणी सोमवारी पुण्यात आले. काल  सकाळपासून आंदोलन पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयासमोर सुरू होते. याचवेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करायला सुरुवात केली. पोलिसांच्या लाठीमारात काही युवकांना चांगलाच मार लागला आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमुळे संतापलेल्या मूकबधीर आंदोलकांनी आक्रमक धोरण स्वीकारले असून सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकू असा इशाराही या विद्यार्थ्यांनी दिला आहे. पोलिसांनी लाठीचार्ज केला नसून सौम्य बळाचा वापर केल्याचे म्हटले आहे. आम्ही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते काय सांगत आहेत, ते आम्हाला कळत नव्हते आणि आम्ही काय सांगतोय ते त्यांना समजत नव्हते. आंदोलकातील एकाने इतरांना इशारा करून पोलिसांवर चालून जाण्यास सांगितले. त्यामुळे थोडे तणावाचे वातावरण बनले. त्यानंतर लाठीचार्ज करावा लागल्याचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर यांनी सांगितले. या मुकबधीर आंदोलकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि खा. सुप्रिया सुळे यांनी भेट दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More