आमदार विवेक पाटील “क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील” पुरस्काराने सन्मानित – eNavakal
उपक्रम मुंबई

आमदार विवेक पाटील “क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील” पुरस्काराने सन्मानित

पनवेल- एका स्वातंत्र्य सेनानींच्या नावाने आणि विशेष म्हणजे माझ्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या नावाने दिला गेलेला पुरस्कार अनन्य साधारण आहे. हा पुरस्कार मला संघर्षाची प्रेरणा देत राहील. असे उद्गार मा आमदार विवेक पाटील यांनी काढले.क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील (बाप्पा) यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित  विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. बाप्पांच्या नावाने सामाजिक पुरस्कार देऊन शेकाप चे लढवय्ये नेते मा आमदार विवेक पाटील यांना सन्मानित करण्यात आले. शेकाप चे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या हस्ते मा आमदार विवेक पाटील यांना  पुरस्कार प्रदान करण्यात आला. कडेगाव तालुक्यातील हणमंतवडीये येथे हा सोहळा शनिवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी  पार पडला.

     आपले मनोगत व्यक्त करताना मा आमदार विवेक पाटील पुढे म्हणाले कि,आजकाल पुरस्कारांचे फॅड निघाले आहे. पण हा पुरस्कार मला मिळाला हे माझे भाग्य आहे कारण हा पुरस्कार एका सच्च्या स्वातंत्र्य सैनिकाच्या नावाने आहे. बाप्पांचे कार्य आमच्यासाठी आदर्शवत आहे. हा पुरस्कार मला सतत सामान्य माणसांच्या प्रश्नांची आठवण करून देत राहील. लढण्याची आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील. या कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सांगळे,क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील, क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील (बाप्पा) जन्मशताब्दी समिती चे अध्यक्ष आत्माराम मोरे,सचिव भीमराव मोरे,कार्याध्यक्ष रघुराज मेटकर आदी मान्यवरांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. किमया पाटील यांनी म्हटलेली कुसुमाग्रजांची प्रार्थना आणि उत्कर्ष पाटील यांनी गायलेले शेतकरी गीत यांपासून कार्यक्रमाला सुरुवात झाली,ऍड सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले तर संगीता  पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे आहे’, असे म्हटले आहे. ‘आरेतील वृक्षतोडीला विरोध करणारे काही वेगळ्या मनसुब्याने काम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

१७८ वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी ‘थॉमस कुक’ बंद

लंडन – १७८ वर्ष जुनी असलेली ब्रिटीश कालीन ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक बंद करण्यात आली आहे. यामुळे १६ देशांतील जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या...
Read More
post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More