आमदार प्रशांत ठाकूर फसवतात का? – eNavakal
News महाराष्ट्र मुंबई

आमदार प्रशांत ठाकूर फसवतात का?

मुंबई – उरण, पनवेल, बेलापूरच्या जमिनी विकासासाठी शासनाने घेतल्या आणि विस्थापितांना बीएमटीसी परिवहनमध्ये मोबदला म्हणून नोकर्‍या दिल्या. मात्र सिडकोने ही बससेवा बंद करून या विस्थापितांना अक्षरशः वार्‍यावर सोडले आहे. आता भाजपात गेलेले आमदार प्रशांत ठाकूर हेही त्यांना फसविणार असेच चित्र आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पनवेल येथे येणार असून त्यांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि गणेश नाईक यांचा पक्षप्रवेश असे दमदार कार्यक्रम आहेत. पण त्यांच्याच भाजपाचे प्रशांत ठाकूर हे जाहीर सभेत प्रकल्पग्रस्तांना आचारसंहितेपूर्वी न्याय देण्याची घोषणा करतात आणि प्रत्यक्षात अद्यापही त्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. याची मुख्यमंत्र्यांना माहिती आहे का? असा सवाल आहे.
भाजपाचे आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी प्रशांत ठाकूर हे प्रकल्पग्रस्तांचा लढा लढत होते. त्यांच्या प्रतिनिधींसह सिडको अध्यक्षांकडे जाऊन भरपाईची मागणी करीत होते. मात्र आमदार बनून सिडकोचेच अध्यक्षपद मिळाल्यावर त्यांनी प्रकल्पग्रस्तांची हेटाळणी सुरू केली आहे. या विषयावर एक बैठक घेऊन त्यांच्या भरपाईच्या निर्णयाची अंमलबजावणीचा निर्णय घेणे हे सिडकोचे अध्यक्ष म्हणून त्यांना सहज शक्य आहे. पण अद्याप त्यांनी एकही बैठक बोलावलेली नाही. ते केवळ भुलथापा मारत असून प्रकल्पग्रस्तांचा मानसिक छळ करीत आहेत. उरण, पनवेल भागात इतरही शासकीय प्रकल्प येत आहेत. त्यांच्या प्रकल्पग्रस्तांचीही अशीच फसवणूक आमदार प्रशांत ठाकूर करतील हे लक्षात घेऊन पूर्ण मोबदला हातात मिळाल्याशिवाय इंचभरही जागा सोडू नका अशीच चर्चा या परिसरात रंगली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

पुढच्या निवडणुकीत चारही पक्षांनी स्वतंत्र लढून जनाधार सिद्ध करावा, चंद्रकांत पाटलांचं आव्हान

कोल्हापूर – राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगवेगळे लढले असते तर त्यांच्या २० आणि १० जागा आल्या असत्या, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजस्थानमधील काँग्रेसचे गेहलोत सरकार वाचले, सचिन पायलट यांचे बंड मागे

जयपूर – राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध पुकारलेले बंड तुर्तास शमले आहे. गेहलोत सरकार वाचले आहे. सचिन पायलट यांनी भाजपाबरोबर...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

Viral Video: भररस्त्यात पत्नीने पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहिलं, आणि…

मुंबई – वाहतूक कोंडीत मेताकुटीला येण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. मात्र आज मुंबईच्या रस्त्यावर फॅमिली ड्रामामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं. या फॅमिली ड्रामाचा...
Read More
post-image
देश

राजकीय परिस्थिती सावरण्यासाठी महाराष्ट्राच्या नेत्याला राजस्थानला रावाना होण्याचे गांधींचे आदेश

नवी दिल्ली – राजस्थानमधील काँग्रेस सरकार (Political crises in Rajasthan) अस्थिर झाले आहे. हे सरकार केव्हाही कोसळण्याची शक्यता असल्याने तेथील परिस्थिती सावरण्यासाठी राहुल गांधींनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सोने पन्नाशीच्या उंबरठ्यावर, ६ महिन्यांत १० हजाराने वाढले

मुंबई – कोरोना व्हायरसमुळे (Corona) लॉकडाऊन (Lockdown) आणि गेल्या काही वर्षात सोन्याच्या दरात (Increase in gold rate) उच्चांकी वाढ झाली आहे. आज सोने पन्नाशीच्या...
Read More