आमचा रंग, अंतरंगही भगवाच! उद्धवजींचे विरोधकांना उत्तर – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आमचा रंग, अंतरंगही भगवाच! उद्धवजींचे विरोधकांना उत्तर

मुंबई – आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 94 व्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेने आपला ‘वचनपूर्ती’ मेळावा जल्लोषात साजरा केला. बीकेसीतील एमएमआरडीएच्या मैदानावर आयोजित केलेल्या या मेळाव्यात 11 ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. आपल्या छोटेखानी भाषणात उद्धव ठाकरे यांनी जे 40 वर्ष विरोधात होते त्यांच्याशी एकत्र येत सरकार बनवले. याचा अर्थ आम्ही भगवा खाली ठेवलेला नाही, आमचे रक्त, अंतरंगही भगवेच आहे, असे सांगत विरोधकांना सडेतोड उत्तर दिले.

यावेळी बोलताना उद्धवजी म्हणाले की, मला आज सर्व जुने 23 जानेवारी आठवले. हाच तो दिवस ज्या दिवशी आपण 5-6 वषार्र्ंपूर्वी शिवबंधन बांधून महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याची शपथ घेतली होती. खरंतर मी ही नवीन जबाबदारी घेतल्यानंतर कोणताही सत्कार स्वीकारणार नव्हतो. पण आज मुद्दाम स्वीकारत आहे. हा माझा नाही तुमचा सत्कार आहे. मी तुमचा कुटुंबप्रमुख आणि सेनापती आहे. मैदानात उतरल्यानंतर जी जबाबदारी माझ्या खांद्यावर येईल त्या जबाबदारीपासून मी कधीही पळ काढला नाही आणि काढणारही नाही.
अनेक शिवसैनिकांना आज मी धन्यवाद देतो. एक अप्रतिम आणि देखणा सोहळा तुम्ही इथे साजरा केलात. पण एक सांगतो ही माझी वचनपूर्ती नाही. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात हात देऊन दिलेल्या वचनपूर्तीच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. ही जबाबदारी मी जरूर स्वीकारली, ही एवढ्यासाठी स्वीकारली की ज्यावेळी आपल्या तेव्हाच्या मित्रपक्षाने दिलेले वचन मोडले. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीमध्ये दिलेले वचन मोडले. ते आपले मंदिर आहे. मंदिरात दिलेला शब्द त्यांनी खाली पाडला आणि असे काही ठरलेच नव्हते असे म्हणत मला खोटे पाडण्याचा प्रयत्न केला. मी नुसता उद्धव ठाकरे नाही. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. मी डरणारा नाही, लढणारा आहे. तुमचा कुटुंबप्रमुख म्हटल्यानंतर जे मी बोललो ते बोललो. तुमच्यासमोर त्यांनी मला खोटे पाडण्याचा प्रयत्न केला. मी काय तुम्हाला तोंड दाखवले असते. तुमच्या मनातही माझ्याबद्दल काय भावना निर्माण झाली असती. शिवसेनाप्रमुखांचा पुत्र खोटे बोलतोय? हे कदापि होणे नाही. प्राण गेला तरी बेहत्तर मी तुमच्याशी आणि माझ्या जनतेशी खोटे बोलणार नाही. म्हणूनच हा एक वेगळा मार्ग मी स्वीकारला. इतकी वर्षे आपण ज्यांच्यावर टीका करत होतो, जे आपले विरोधक होते त्यांचा हात हाती घेऊन मी सरकार स्थापन केले. हो उघडपणाने केले. चोरूनमारून केले नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की हा भगवा आम्ही खाली ठेवला. ना आमचा रंग आम्ही बदला ना अंतरंग. आमचा अंतरंग भगवाच आहे आणि आमचा रंगही भगवाच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, आजच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि नगरसेवक, शाखाप्रमुख यांच्यासहित राज्यभरातून आलेले शिवसैनिक हजर होते. यावेळी शिवेसना झिंदाबाद, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, उद्धव ठाकरे झिंदाबाद, हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला होता. या सत्कार सोहळ्यात झालेल्या जल्लोष कार्यक्रमात नामवंत कलाकार अवधुत गुप्ते, शंकर महादेवन, अभिजीत केळकर, मयुरेश पेम, बेला शेेंडे यांनी संगीताचा रंगारंग कार्यक्रम सादर केला. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, अभिनेेते कुणाल गांजावाला, श्रेयस तळपदे, निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे यांनी विनोदाची बरसात केली. तर विख्यात गायक सुखविंदर सिंग आणि तालवादक शिव मणी यांची सांगितीक जुगलबंदीही प्रचंड गाजली. संगीतकार अजय-अतुल यांचाही मनोरंजनपर कार्यक्रम सादर झाला. यावेळी नितीश भारती यांच्या वाळूद्वारे तयार केलेल्या विविध कलाकृती या सवार्र्ंच्या आकर्षण ठरल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे, अभिजीत खांडकेकर, शरद केळकर आणि मधुरा वेलणकर यांनी केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

बाबरी मशिदीसाठी मिळाली ‘ही’ जागा

अयोध्या- अयोध्येपासून ३० किमी दूर असलेल्या धन्निपूर येथे बाबरी मशिद बांधण्यास पाच एकर जमीन सुन्न वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. ही जागा स्विकारण्याचा निर्णय...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी- अण्णा हजारे

अहमदनगर – फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांचीही निवड थेट जनतेतून व्हावी असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सरपंच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

#TrumpInIndia ताजने आम्हाला प्रेरित आणि चकीत केलं- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प, कन्या इव्हान्का ट्रम्प आणि जावई जॅरेड कुशनर यांच्यासह आज पहिल्यावहिल्या भारत भेटीवर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माळेगावचा पहिला निकाल, अजित पवारांच्या पॅनलला यश

बारामती -अतितटीच्या ठरलेल्या माळेगाव कारखानच्या निवडणुकीत ब वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्वप्नील जगताप यांनी विजय मिळवला आहे. अन्य २० जागासाठी मतमोजणी सुरू आहे. माळेगाव कारखान्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जयसिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात

सोलापूर – सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीचा दाखला रद्द करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीने हा दाखला बनावट असल्याचे सांगत रद्द केला. त्यामुळे...
Read More