आपली दुसर्‍या क्रमांकाची सर्वोत्तम शतकी खेळी – विराट – eNavakal
News क्रीडा

आपली दुसर्‍या क्रमांकाची सर्वोत्तम शतकी खेळी – विराट

लंडन – भारत-इंग्लंडमधील संघातील पहिल्या कसोटी सामन्यात दुसर्‍या दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहलीने दमदार शतकी खेळी केली. आपल्या कारकिर्दीतील कसोटी सामन्यातील ही दुसर्‍या क्रमांकाची सर्वोत्तम शतकी खेळी असल्याचे विराटने सामना संपल्यावर सांगितले. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात त्याने दुसर्‍या डावात शतकी खेळी केली होती. ही शतकी खेळी आतापर्यंतची आपली सर्वोत्तम खेळी असल्याचे विराटने सांगितले. 2014 च्या इंग्लंड मालिकेत 10 डावात विराटला अवघ्या 134 धावा करता आल्या होत्या. यंदा मात्र पहिल्याच सामन्यात 149 धावांची सुरेख खेळी करून या दौर्‍याला जोरदार प्रारंभ केला आहे. गेल्या मालिकेतील खराब कामगिरीचे शल्य आपल्याला सतत सतावत होते. आता या शतकांमुळे मी आता काहीसा रिलॅक्स झाल्याचे तो म्हणाला. ही खेळी करताना दडपण तर होतेच, त्यातच दुसर्‍या बाजूने भारतीय फलंदाज एका पाठोपाठ बाद होत होते. अशा परिस्थितीत मी शतकी खेळी करून भारताचा डाव सावरण्याचा आणि इंग्लंडची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यात आपण यशस्वी झाल्याचे त्याने स्पष्ट केले. ढगाळ वातावरणात इंग्लंड वेगवान गोलंदाजाचा मुकाबला करणे सोपे नव्हते. त्यातच चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय फलंदाजी ढेपाळली. याचा फायदा इंग्लंंड संघाने पुरेपूर घेतला. हार्दिक पांड्या, इशान शर्मा आणि उमेश यादव यांचे देखील विराटने कौतुक केले. त्या तिघांनी केलेल्या संयमी फलंदाजीमुळेच मी शतक काढू शकलो आणि इंग्लंडची आघाडी कमी करून शकलो. इंग्लंड गोलंदाजांचा यशस्वी मुकाबला करण्याचे आव्हान आपण स्वीकारले होते. त्यामुळे सहजासहजी विकेट फेकायची नाही. हा मनाशी ठाम निश्चय करून मी एक बाजू लाऊन धरण्यात यशस्वी झालो. या शतकी खेळीने आपल्याला नवा हुरूप मिळाला असून राहिलेल्या कसोटीत देखील मोठी धावसंख्या काढण्याचा इरादा विराटने स्पष्ट केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज वर्षावर बैठक

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस नव्या रुग्णांची भर पडत आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार ७५८ वर पोहोचली आहे. तर...
Read More
post-image
महाराष्ट्र

गर्दी हटेना! उथळसर विभाग आजपासून पूर्णतः बंद

ठाणे – गेल्या १२ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये ७८ ने वाढ झाली आहे. महापालिका प्रशासनाने अद्ययावत कंटेनमेंट झोनची यादी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात एसआरपीएफच्या आणखी १४ जवानांना कोरोना

पुणे – पुण्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) आणखी १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ३३ जवानांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईत १००२, पुण्यात ३२७ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५४,७५८ वर

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलं आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. मंगळवारी 2091 नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 54 हजार 758 वर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More