आपण कागदी नव्हे तर खरे वाघ आहोत – मुख्यमंत्री – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आपण कागदी नव्हे तर खरे वाघ आहोत – मुख्यमंत्री

नागपूर- आपण कागदी वाघ नसून, खरे वाघ आहोत, असे सांगत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला. आज नागपूरच्या कोराडी येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी चार वर्षात केलेले काम जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आता भाजप पदाधिकार्‍यांवर असल्याचे सांगितले.

पूर्व विदर्भातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक नागपूरच्या कोराडी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी आगामी काळातील पक्षाच्या वाटचालीविषयी पदाधिकार्‍यांना महत्त्वपूर्ण आदेश दिले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही नेते फक्त वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापून आणून स्वत:ला मोठे नेते समजतात. आपला पक्ष मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट असा आहे. वुई आर नॉट पेपर टायगर्स, असे म्हणत मख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे नाव न घेता टोला हाणला.तसेच तुम्ही खरे टायगर्स आहात. तुम्ही जनेत जाऊन काम करणारे लोक आहात. 15 ते 20 वर्षे आपल्याला सत्तेत राहायचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आपल्या कामाबद्दल भ्रम पसरवण्याचा काम करत आहे. मात्र भाजपा कार्यकर्त्यांनी तर्कशुध्द माहितीच्या आधारे त्या भ्रम पसरवण्याच्या प्रयत्नांना यश द्यावे. एवढेच नाहीत स्वामिनाथन आयोगाचा अहवाल नऊ वर्षे थंड बस्त्यात ठेवल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सध्या देशभर विरोधी पक्षांच्या ऐक्याची चर्चा आहे. मात्र त्याचे कोणतेही परिणाम भाजपावर होणार नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोधकांचे चांगले ट्रेनिंग देणार असे सांगत खिल्ली उडवली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र मुंबई

मॉल पार्किंग मोफत देण्याचा कायदा आहे का? मुंबई हायकोर्टाचा पुणे पालिकेला सवाल

मुंबई – पुणेकरांना मॉलमध्ये पार्किंग शुल्क फ्री करण्याबाबत पालिकेचा कायदा आहे का? असा सवाल उच्च न्यायालयाने आज उपस्थित केला. पार्किंगचे शुल्क वसूल करण्यास मनाई...
Read More
post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More