आनंदवार्ता…मान्सून अंदमानात दाखल – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

आनंदवार्ता…मान्सून अंदमानात दाखल

नवी दिल्ली – १८ ते १९ मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार अखेर आज मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे 30 मेपर्यंत मान्सून दाखल होतो. पण यावेळी मान्सून काही दिवस आधीच अंदमानात दाखल झाला असल्याने बळीराजा सुखावला आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अंदमान निकोबार बेटं, अंदमानातील समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, दरवर्षी अंदमान-निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन होते त्यानंतर बंगालच्या उपसागरावरून हे वारेउत्तरेकडे पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यांकडे सरकतात. त्यानंतर मान्सून केरळमध्ये आणि पुढे कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल होतो.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More
post-image
देश

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

मुंबई – आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर...
Read More
post-image
महाराष्ट्र

साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर दिब्रिटोंच्या निवड, विहिंपकडून विरोध

उस्मानाबाद – 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. याला विश्व हिंदू परिषदेने...
Read More