आधी परदेश दौरे आणि जाहिराती बंद करा! सोनियांचे मोदींना खडेबोल – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

आधी परदेश दौरे आणि जाहिराती बंद करा! सोनियांचे मोदींना खडेबोल

नवी दिल्ली – कोरोनाच्या महामहारीशी लढण्यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्व खासदार आणि सर्व राज्यपालांच्या मानधनात तीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. आज काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना पत्र पाठवून त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा देतानाच चार खडेबोल सुनावले आहेत. सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना सांगितले की, आधी स्वतःचे उदात्तीकरण करणाऱ्या टीव्हीवरच्या आणि वर्तमानपत्रातील तसेच इतर सोशल मीडियावरील हजारो कोटींच्या जाहिराती थांबवा आणि परदेश दौरे बंद करा.

सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रात पाच मुद्दे मांडले आहेत. त्यात त्यांनी दिल्लीच्या 20 हजार कोटींच्या सौंदर्यीकरण योजनेचाही उल्लेख केला आहे. त्या म्हणतात, ‘मोदीजी तुमचे स्वतःचे उदात्तीकरण करणारी ही ‘सेंट्रल व्हींस्टा ‘ सौंदर्यीकरण योजना थांबवा. तसेच टीव्ही आणि वर्तमानपत्रांना देण्यात येणाऱ्या हजारो कोटींच्या सरकारी जाहिराती थांबवा. तुमचे सगळे परदेश दौरे रद्द करा. त्यामुळे कोरोनाविरोधात लढण्यासाठी हजारो कोटी रुपये उपलब्ध होतील.

दिल्लीमध्ये ‘सेंट्रल व्हिस्टा ‘या सौंदर्यीकरण योजनेअंतर्गत नवीन संसद भवन बांधण्याची योजना आहे. सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना सांगितले की, सध्याच्या ऐतिहासिक संसद भवनात संसदेचे काम व्यवस्थितपणे चालेल. त्यासाठी ‘सेंट्रल विस्टा’ योजनेची गरज नाही तूर्तास गरज नाही. सध्या केंद्र सरकार दरवर्षी जाहिरातींवर 1,250 कोटी रुपये खर्च करते. त्या जाहिराती बंद करा. देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान मंत्री आणि खासदारांची शिष्टमंडळे यांच्या परदेश दौर्‍यासाठी दरवर्षी 393 कोटी रुपये खर्च होतात. हे सर्व पैसे कोरोना महामारी मुळे उध्वस्त झालेल्या स्थलांतरित कामगारांच्या, मजुरांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरा.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका कळीच्या मुद्द्याला हात घातला आहे. त्यांनी मोदींना सांगितले आहे की, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी असताना दुसरा खाजगी चारिटेबल ट्रस्टचा ‘पीएम केअर्स फंड’ स्थापन करण्याची गरज नव्हती. आता केलाच आहात तर ‘पीएम केअर्स फंडात जमा झालेला पैसा पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मध्ये म्हणजेच पीएम फंडात जमा करा. कालच काँग्रेसचे खासदार आणि माजी मंत्री शशी थरूर यांनी या ‘पीएम केअर्स फंडाला हरकत घेतली होती. तसेच विख्यात इतिहासकार रामचंद्र गुहा यांनीही मोदींवर सडकून टीका केली होती. आज विरोधी पक्षातर्फे सोनिया गांधी यांनी रीतसर पंतप्रधान मोदींना राजकीय व धर्म संकटात टाकले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More