आदिवासी विवाहितेवर अत्याचार; एकास अटक – eNavakal
News महाराष्ट्र

आदिवासी विवाहितेवर अत्याचार; एकास अटक

संगमनेर – आदिवासी विवाहीतेवर अत्याचार करुन पसार झालेल्या संदीप दत्तात्रय दिघे या नराधमाला पोलिसांनी पुण्यातून अटक केली. गुरुवारी सायंकाळी संगमनेर ( जि. नगर ) तालुक्यातील वाघापूर शिवारातील एका आदिवासी महिलेवर चाकूचा धाक दाखवून त्याने अत्याचार केला होता.

राहुरी तालुक्यातील रहिवासी असलेले एक आदिवासी जोडपे तालुक्यातील वाघापूर शिवारातील एका शेतकर्‍याकडे वाट्याने शेती करते. गुरुवारी ( दि. 6 ) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सदरची 32 वर्षीय विवाहिता शेतातील काम उरकून आपल्या घरी परतली. तेव्हा तिचा मुलगा शाळेतून घरी परतलेला नव्हता व पतीही शेतात राबत होता. थकलेल्या स्थितीत त्या विवाहितेने स्वयंपाकाची तयारी सुरु केली असता त्याचवेळी आरोपी संदीप दत्तात्रय दिघे ( रा. वाघापूर) हा दुसर्‍याच्या शेतात काम करणारा मजूर नेहमीप्रमाणे विहीरीवरील मोटार खाली करण्याच्या बहाण्याने तेथे आला व सदरची विवाहिता एकटीच असल्याचे पाहून तिच्या घरात घुसून त्याने चाकूचा धाक दाखवित तिच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर आरोपी पसार झाला. याप्रकरणी पिडीतेने फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बलात्कार व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपीचे मोबाईल लोकेशन पुणे दाखवत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याचा माग काढत त्यास पुणे येथून अटक करीत गजाआड केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

(अपडेट) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणास मराठीतून सुरुवात

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते कल्याणमध्ये दाखल झाले असून त्यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले आहे. ३३...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPLAuction2019 आयपीएलच्या लिलावास सुरुवात

जयपूर – पुढील वर्षी सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) लिलावास सुरुवात झाली आहे. जयपूर येथील हा लिलाव पार पडत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

कल्याणकरांकडून मोदींसाठी गाजराचे तोरण

कल्याण – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले. एकीकडे भूमिपूजनासाठी येणाऱ्या मोदींच्या स्वागतासाठी भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मोदींच्या सभेसाठी परिसरातील दुकाने बंद; व्यापारी संतप्त

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले. मोदी कल्याणमध्ये दाखल होणार असल्याने मोठा सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय कर्मचार्‍यांचे 27 डिसेंबरला उपोषण

मुंबई – मुंबईतील वाचन संस्कृती वाढावी म्हणून मेहनत करणार्‍या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कर्मचार्‍यांना गेल्या अनेक वर्षांत वेतनवाढ व बढती मिळालेली नाही. तीन वेळा आंदोलन करूनही...
Read More