आदिवासी विकास योजनेतील दोषींवर गेल्या वर्षभरात कोणती कारवाई केली – eNavakal
News मुंबई

आदिवासी विकास योजनेतील दोषींवर गेल्या वर्षभरात कोणती कारवाई केली

मुंबई- आदिवासी विकास मंत्रालयाच्या विकास योजनेच्या 6 हजार कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करणार्‍या माजी न्यायमूर्ती एम.जी गायकवाड कमिटीच्या अहवालानंतर गेल्या वर्षाभरात काय केले? कोणती पावले उचललीत?, किती जणांविरोधात गुन्हे दाखल केले, किती जणांची चौकशी केली? आदी प्रश्‍न उपस्थित करून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन.एम. जामदार यांच्या खंडपीठाने दोषी विरोधात किती दिवसात कारवाई करणार ते प्रतिज्ञापत्रावर सांगा असेही राज्य सरकारला बजावले.

आदिवासी विकास मंत्रालयामार्फत राज्यात राबविल्या जाणार्‍या आदिवासी विकास योजनांत कोट्यावधी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करणारी जनहित याचिका नाशिक येथील बहिराम मोतीराम आणि गुलाब पवार यांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन.एम.जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी यांनी या घोटाळ्याची चौकशी स्थापन केलेल्या गायकवाड कमिटीने दोषी ठरविलेल्या मंत्र्यांना आणि सनदी अधिकार्‍यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आदिवासी विभागामार्फत केला जात आहे. आरोपींना म्हणणे मांडण्याची संधी देण्याची कोणतीही तरतूद नसताना दिली जात आहे. खाते निहाय चौकशीच्या नावाखाली वेळ काढूपणा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आतापर्यंत काहीच केले नाही. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांविरोधात आरोपपत्रही दाखल केले नाही याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याची गंभर दखल
न्यायालयाने घेतली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कुकडी नदीवरील बंधारा पाण्याअभावी कोरडाच

कवठे येमाई – शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रुक येथील कुकडी नदीवरील बंधारा अखेर पाण्याअभावी कोरडाच राहिला असून पाणी न आल्यास या प्रश्नी तीव्र आंदोलन करण्याचा कडक...
Read More
post-image
News देश निवडणूक

बिहारमध्ये महाआघाडीचे जागावाटप जाहीर

पाटणा – लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये आज महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा झाली. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टी या पक्षांच्या महाआघाडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आक्रमक

रत्नागिरी – एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आता आक्रमक झाले आहेत. याच विषयासंदर्भात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात...
Read More
post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More