आदिवासी एकता परिषदेचे आमरण उपोषण – eNavakal
महाराष्ट्र

आदिवासी एकता परिषदेचे आमरण उपोषण

वाडा – आदिवासी एकता परिषद व भूमी सेना यांच्या महिला कार्यकर्त्यांनी आज वाडा तहसील कार्यालयाच्या समोर वाडा पोलिसांच्या विरोधात आमरण उपोषण सुरु केले.
कोंढले येथील विजय पाटील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असूनही त्यांच्यावर काहीही कारवाई केलेली नाही, तसेच विजय पाटील यांनी आदिवासी एकता परिषदेच्या कचरा टाकून आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, कोंढले येथीलच सुरेखा मुकणे यांनी जगदीश तोतले यांच्याविरोधात मारहाण व मंगळसूत्र चोरीची तक्रार केली होती त्याच्यावरही कारवाई झालेली नाही, तीन महिन्यांपूर्वी निचोळे येथील शितल पिलाने या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्यांनी पळवली होती ते चोरटेही पकडले गेले नाहीत, अश्या विविध प्रकारच्या तक्रारी दाखल केल्या असूनही वाडा पोलिसांनी काहीही कारवाई केलेली नसल्यामुळे गुरुवार पासून तक्रारदार महिला, भूमिसेना व आदिवासी एकता परिषदेचे कार्यकर्ते आमरण उपोषणास बसले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

भारताला इराणचा मोठा धक्का, चाबहार रेल्वे प्रकल्पातून वगळले

नवी दिल्ली – इराणने चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला बाहेर काढले आहे. भारताकडून निधी मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. भारत...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

अंबरनाथ, बदलापूरचे व्यापारी लॉकडाऊनमुळे आंदोलनाच्या तयारीत

अंबरनाथ – कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे गेल्या चार महिन्यांपासून होत असलेल्या सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्ग मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे आता सध्या लागू केलेल्या १९ जुलैपर्यंतच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश विदेश

शाळांना राजकीय फुटबॉल बनवू नका! डब्लूएचओचा इशारा

नवी दिल्ली – कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने शाळा, महाविद्यालये बंद आहेत. एकीकडे अनेक देशांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला असताना काही देश मात्र पुन्हा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता ९ लाखांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली – जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अद्यापही वाढतच आहे. देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता ९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बी अमिताभ बच्चन कोरोनामुक्त होईपर्यंत यज्ञात आहुती देणार

कोलकाता – बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना सुरू केली आहे. अमिताभ कोरोनामुक्त व्हावेत यासाठी चाहते...
Read More